अवैध वीटभट्ट्यांना अभय

By Admin | Published: June 24, 2014 12:55 AM2014-06-24T00:55:42+5:302014-06-24T01:09:21+5:30

नेवरगाव : गंगापूर तालुक्यातील नेवरगाव, हैबतपूर, म्हसोबाची वाडी, वाहेगाव, अगरकानडगाव, ममदापूर, बगडी आदी ठिकाणी अवैध वीटभट्ट्यांना एकप्रकारे अभय मिळाले

Illegal bribe | अवैध वीटभट्ट्यांना अभय

अवैध वीटभट्ट्यांना अभय

googlenewsNext

नेवरगाव : गंगापूर तालुक्यातील नेवरगाव, हैबतपूर, म्हसोबाची वाडी, वाहेगाव, अगरकानडगाव, ममदापूर, बगडी आदी ठिकाणी अवैध वीटभट्ट्यांना एकप्रकारे अभय मिळाले असून, विटांसाठी लागणाऱ्या मातीची गोदाकाठावरून मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे. वीट भट्ट्यांतून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विशेष म्हणजे जायकवाडीसाठी संपादित केलेल्या जमिनीतून हजारो ब्रास माती अहोरात्र ट्रॅक्टर आणि डंपरद्वारे नेली जात आहे. हे वीटभट्टीचालक ५० ते १०० ब्रासची रॉयल्टी भरतात आणि उपसा मात्र ४ ते ५ हजार ब्रास करीत आहेत.
त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. काही वीटभट्टीचालक तर रॉयल्टी न भरताच मातीचा उपसा करीत आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाला या बाबीची माहिती आहे. त्यामुळे या भागात किती वीटभट्ट्या आहेत? किती जणांनी रॉयल्टी भरली याची सर्व माहिती तलाठ्याकडून मागवून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
प्रशासनाच्या दुुर्लक्षामुळे माती चोरांचे चांगलेच फावले असून नदीकाठच्या जमिनीची मात्र चाळणी होत आहे. (वार्ताहर)
वाळूची तस्करी
परिसरात मातीसोबतच गोदाकाठातून वाळूचीही मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे. वाळू तस्करीला प्रशासनाचा वरदहस्त असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. वाळू तस्करांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळूचे साठे करून ठेवले आहेत. या वाळू तस्करांवरही कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे केली जात आहे.

Web Title: Illegal bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.