अवैध बांधकामांचा विळखा

By Admin | Published: September 9, 2015 12:12 AM2015-09-09T00:12:42+5:302015-09-09T00:27:45+5:30

जालना : शहरात गत काही वर्षांपासून अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. अतिक्रमणाच्या विळख्यामुळे शहराची अवस्था बकाल होत आहे.

Illegal construction | अवैध बांधकामांचा विळखा

अवैध बांधकामांचा विळखा

googlenewsNext


जालना : शहरात गत काही वर्षांपासून अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. अतिक्रमणाच्या विळख्यामुळे शहराची अवस्था बकाल होत आहे. विशेष म्हणजे पालिकेतील नोंदीनुसार केवळ ६५ अनधिकृत बांधकाम असल्याचे दिसून येते. मात्र, शहरात प्रत्यक्ष पाहणी केल्यास नोंद अगदीच किरकोळ असल्याचे दिसून येते.
शहराचा विस्तार काही वर्षांपासून वाढत आहे. अनेक नागरिकांनी बाँड तसेच करारावर घरे बांधली आहेत. नवीन तसेच जुना जालना भागात काहींनी मात्र अनधिकृत बांधकामे करीत नियम धाब्यावर बसविले आहेत. २०१४ मध्ये ५६ अनधिकृत बांधकामे तर २०१५ मध्ये अनधिकृत बांधकामांची पालिकेकडे नोंद आहे. मात्र शहराचा विस्तार पाहता ही नोंद असून, नसल्यासारखीच आहे. अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप काही संघटनांसह नागरिकांनी केला आहे. शहरातील प्रत्येक प्रभाग तसेच मुख्य रस्त्यांवर अनधिकृत बांधकामासोबतच अतिक्रमणे वाढली आहेत.
दरम्यान, काही ठिकाणी पालिकेकडूनच अशा बांधकामांना अभय मिळत असल्याचे चित्र आहे. वर्षभरात पालिका ६५ अनधिकृत बांधकामे सांगत असली तरी मुळात अशी बांधकामे हजारोंच्या संख्येत असल्याची माहिती आहे. अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांमुळे रस्ते अरुंद होण्यासोबतच पालिकेच्या जागाही काही ठिकाणी गिळंकृत होत आहेत. (प्रतिनिधी)
शहरातील काही भागात नियमानुसार रजिस्ट्रीच होत नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांकडे मालमत्तापत्रक नाही. असे असले तरी शहरात शेकडो घरे उभी आहेत. रजिस्ट्रीच होत नाही तर पालिकेने बांधकाम परवानगी कोणत्या मुद्यावर दिली, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.
कारवाई सुरूच
४नगर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, अनधिकृत बांधकाम प्रकरणी अनेकांना स्वच्छता निरीक्षकांमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी पालिकेकडून वेळावेळी कारवाई करण्यात येते. अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच मोहीम राबविण्यात येणार आहे.

Web Title: Illegal construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.