अवैध गौणखनिज उत्खनन, १ जेसीबी, ३ ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:04 AM2021-09-21T04:04:27+5:302021-09-21T04:04:27+5:30
तालुक्यातील शिवना नदीवर हतनूर व कन्नड शिवारात काही ठिकाणी नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा करून नदीकाठालगत साठे तयार करण्यात आले ...
तालुक्यातील शिवना नदीवर हतनूर व कन्नड शिवारात काही ठिकाणी नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा करून नदीकाठालगत साठे तयार करण्यात आले आहेत. त्यातून अंदाजे पाच ब्रास वाळू तहसील कार्यालयात आणून जप्त करून पुढील कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख निवासी नायब तहसीलदार मोनाली सोनवणे, अव्वल कारकून सत्यजित आव्हाड, कोतवाल बशीर शेख यांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री केली. कारवाईदरम्यान पोलीस ठाणे शहरचे पोलीस निरीक्षक तळेकर, पोलीस नाईक बर्डे, कॉन्स्टेबल वसावे उपस्थित होते.
---------
तालुक्यांमध्ये अवैध वाळू, मुरूम या गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करताना निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. माती, मुरुम, आदी गौण खनिजाची आवश्यकता असल्यास तहसील कार्यालयाकडून रीतसर परवानगी घ्यावी. - संजय वारकड, तहसीलदार