वाळूज हद्दीत अवैध वाळू वाहतूक थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 09:39 PM2019-08-27T21:39:56+5:302019-08-27T21:40:07+5:30
वाळूज पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळूज उपसा व वाहतूक सर्रासपणे सुरुच असून, यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.
वाळूज महानगर : वाळूज पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळूज उपसा व वाहतूक सर्रासपणे सुरुच असून, यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अवैध वाळू उपसा व वाहतूक जिल्हाधिकाऱ्यांनी थांबवावी, अशी मागणी परिसरातील लोकप्रतिनिधींनी केली आहे.
वाळूज परिसरातील लांझी, शिवपुर, पिंपरेखडा, शेंदुरवादा, पैठण आदी भागातून वाळूची अवैध वाहतूक करण्यात येते. वाळूच्या अवैध वाहतुकीतून महिन्याला काही लाख रुपयांची उलाढाल होत असून, यात काही राजकीय वरदहस्त व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक उतरले आहेत. वाळूमाफियांना पोलिस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्यानेच ही अवैध वाहतूक बिनबोभाटपणे सुरु असल्याचे दिसते. वाळूमाफियांच्या दहशतीमुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाही. या परिसरातील वाळूपट्ट्यांतून अनेक दिवसांपासून जेसीबीच्या सहाय्याने अवैधपणे वाळू उपसा सुरुच आहे.
दररोज हायवा, ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर आदी जवळपास ५० ते ६० वाहनांतून वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत आहे. मध्यंतरी गंगापूरचे तहसीलदार डॉ. अरुण जºहाड यांनी वाळूमाफियाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारल्यामुळे काही काळ वाळू चोरी व वाहतुकीवर अंकुश लागला होता.
मात्र मोहिमेत सातत्य नसल्याने वाळूची चोरटी वाहतुक पुन्हा जोमाने सुरु झाल्याचे चित्र आहे.
वाळू वाहतुकीतील साखळी
वाळूची चोरटी वाहतूक करणाºयांकडून अर्थपूर्ण व्यवहासाठी व्यक्त नेमण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. वाळूज ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्यांच्या मुलाकडेच ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते. त्यामुळे वाळूज महानगर परिसरातून वाळूची बिनदिक्कतपणे अवैध वाहतूक सुरुच असल्याचे दिसते.