अवैध वाळू वाहतूक; चार वाहनांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:47 AM2017-08-03T00:47:37+5:302017-08-03T00:47:37+5:30

शासनाच्या परवानगीशिवाय अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाºया ४ वाहन चालक व मालकांविरूद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़

Illegal sand transport; Crime on four vehicles | अवैध वाळू वाहतूक; चार वाहनांवर गुन्हा

अवैध वाळू वाहतूक; चार वाहनांवर गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : शासनाच्या परवानगीशिवाय अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाºया ४ वाहन चालक व मालकांविरूद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़
तालुक्यातील पोहंडूळ येथील गोदावरी नदीपात्रातून १ आॅगस्ट रोजी रात्री ९़३० च्या सुमारास टिप्पर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल कर्मचाºयांना मिळाली़ या अधिकाºयांनी घाटावर जावून पाहणी केली तेव्हा ट्रॅक्टर क्रमांक एमएच २२ एच-५५०७ या ट्रॅक्टरमध्ये दोन ब्रास वाळू, टिप्पर क्रमांक एमएच २२ एबी-९५५०, एमएच २३ सी-८२१८ मध्ये ४ ब्रास वाळू आढळली़ तसेच एमएच २२ एडी-१५२७ या क्रमांकाचा जेसीबी या ठिकाणी आढळला़ या चारही वाहनांच्या चालकांनी पथकाला पाहून पलायन केले़ या प्रकरणी वाहनांच्या चालक व मालकांविरूद्ध अवैध वाळू उत्खनन, वाहतूक निर्गमन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तलाठी अनिल कदम, पंच आश्रोबा कुºहाडे, पोलीस उपनिरीक्षक बी़ आऱ जाधव, परसोडे यांच्या पथकाने कारवाई केली़ देवराव मुंडे तपास करीत आहेत़

Web Title: Illegal sand transport; Crime on four vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.