अवैध वाळूसाठे पथकाने केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:20 AM2017-11-15T00:20:22+5:302017-11-15T00:20:29+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच अवैैधरित्या वाळूचे साठे केले जात असृून या ठिकाणाहून दररोज जादा दराने वाळूची विक्री होत आहे. शुक्रवारी महसूलच्या प्रशासनाने या वाळूसाठ्यावर कारवाई केली.

Illegal sandstorm seized by the squad | अवैध वाळूसाठे पथकाने केले जप्त

अवैध वाळूसाठे पथकाने केले जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
राणीसावरगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच अवैैधरित्या वाळूचे साठे केले जात असृून या ठिकाणाहून दररोज जादा दराने वाळूची विक्री होत आहे. शुक्रवारी महसूलच्या प्रशासनाने या वाळूसाठ्यावर कारवाई केली.
राणीसावरगाव हे मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. या ठिकाणी बांधकामाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सध्या गंगाखेड, पालम या भागात वाळू माफियांवर कारवाई केली जात असून त्यांचे वाळूसाठे जप्त केले जात आहेत. त्यामुळे तालुक्यापासून दूर अंतरावर वाळूसाठे तयार केले जात आहेत. राणीसावरगाव हे गंगाखेड शहरापासून दूर अंतरावर असून वाळू तस्कर गंगाखेड परिसरातून आणलेली वाळू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात साठा करुन ठेवत आहेत. येथे साठविलेल्या वाळूची सकाळपासून बेभाव दराने विक्री केली जात आहे.
यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. दोन वर्षापासून हा प्रकार सुरु आहे. दरम्यान, या वाळूसाठ्याची माहिती मिळताच गंगाखेड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार जी.बी. काळे, तलाठी व्ही.एस. मुळे यांनी १३ आॅक्टोबर रोजी राणीसावरगाव येथे येवून वाळूसाठ्याचा पंचनामा केला व हा साठा ताब्यात घेतला.

Web Title: Illegal sandstorm seized by the squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.