परळीत वाढले अवैध धंदे
By Admin | Published: April 24, 2016 11:47 PM2016-04-24T23:47:50+5:302016-04-25T00:40:37+5:30
परळी : शहरात पोलीस निरीक्षकांच्या नाकावर टिचून मटका, गुटखा जोरात चालू असून, गावठी दारुची विक्रीही सर्रास चालू असल्याचे चित्र आहे.
परळी : शहरात पोलीस निरीक्षकांच्या नाकावर टिचून मटका, गुटखा जोरात चालू असून, गावठी दारुची विक्रीही सर्रास चालू असल्याचे चित्र आहे. शहर पोलीस ठाण्याच्या समोरच आॅनलाईन मटक्याची तीन दुकाने चालू आहेत हे विशेष.
मटका जुगाराची दररोज आठ लाखांची उलाढाल असल्याची खात्रीलायक माहिती आहे. एवढीच उलाढाल गुटखा व्यवसायात होते. मटका जुगारामुळे सर्वसामान्य नागरिक आमिषाला बळी पडून कंगाल होत आहेत, तर गुटख्यामुळे मौखिक आजार वाढू लागले आहेत. शहरातील अनेक ठिकाणी गावठी दारुची सर्रास विक्री होत आहे.
शहरात मटका चालू नाही, असे परळीचे पोलीस अधिकारी सांगतात अन् बीडच्या जिल्हा पोलीस पथकाकडून परळीतमटका अड्ड्यांवर धाडी टाकून दोन मोठ्या कारवाया केल्या केल्या. त्यानंतरही गुन्हा दाखल झालेल्या मटका माफियांना शहर पोलीस अधिकारी पकडू शकले नाहीत.
याबाबत निरीक्षक सोपानराव निघोट यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, कारवाया सुरू आहेत. अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही. (वार्ताहर)