औरंगाबाद जिल्ह्यात लागू केलेला लॉकडाऊन त्वरित रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:04 AM2021-03-31T04:04:16+5:302021-03-31T04:04:16+5:30

औरंगाबाद: जिल्ह्यात लावलेला कडक लॉकडाऊन त्वरित रद्द करावा, अशी मागणी भारतीय दलित पँथरच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन ...

Immediately cancel the lockdown imposed in Aurangabad district | औरंगाबाद जिल्ह्यात लागू केलेला लॉकडाऊन त्वरित रद्द करा

औरंगाबाद जिल्ह्यात लागू केलेला लॉकडाऊन त्वरित रद्द करा

googlenewsNext

औरंगाबाद: जिल्ह्यात लावलेला कडक लॉकडाऊन त्वरित रद्द करावा, अशी मागणी भारतीय दलित पँथरच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन करण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग हा न संपणारा असल्याचे डब्ल्यू.एच.ओ.ने सुध्दा स्पष्ट केले आहे. असे असतांना जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करून हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आणली आहे. लॉकडाऊन करण्याअगोदर शहराच्या विविध भागात राहणाऱ्या गोर-गरिबांसाठी अन्न-धान्याची सोय करावी, या काळातील घरभाडे, व्यावसायिकांचे दुकान भाडे कसे भरावे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शासनाने प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यावर १० हजार रूपये जमा करावे, दिव्यांग व्यक्तींचे मनपाकडे थकलेले पैसे त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात भारतीय दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष संजय जगताप, जिल्हाध्यक्ष कडूबा गवळे, जिल्हा संपर्क प्रमुख किशोर गडकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा काजल केदारे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा दीपाली साळवे, नवीन शहराध्यक्ष किरण जगताप, विक्रम जगताप, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शैलेश बागूल, युवा शहराध्यक्ष अनिल उगले, राहुल गवळी, आनंद हिवराळे, प्रमोद कोथमिरे, विजय रगडे, सुरेश जगधडे, रमेश दामोदर आदींचा समावेश होता.

Web Title: Immediately cancel the lockdown imposed in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.