खाण्याचा सोडा वापरून घरीच करा गणेशमूर्तीचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:05 AM2021-09-03T04:05:10+5:302021-09-03T04:05:10+5:30
(स्टार ११३०) प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्ती विसर्जनावर ...
(स्टार ११३०)
प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्ती विसर्जनावर बंधने आली आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे घरी बादलीतील पाण्यात खाण्याचा सोडा मिसळून त्यात पीओपीची मूर्ती विसर्जन केल्यास ती लवकर विरघळते, असे चार वर्षांपूर्वीच संशोधन झाले आहे. त्यामुळे आता पीओपीच्या मूर्तीचे बिनधास्तपणे घरीच विसर्जन करा.
प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेशमूर्ती विरघळत नसल्याने आजपर्यंत अशा मूर्तीच्या खरेदी-विक्रीवर आक्षेप घेतला जात होता. मात्र, मूर्तीच्या वजनाइतकाच खाण्याचा सोडा पाण्यात मिसळला, तर ही मूर्ती अवघ्या दोन तासांत विरघळते, असे संशोधन चार वर्षांपूर्वीच पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने केले होते. विरघळलेले पीओपी नापीक जमिनीसाठी उत्तम असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मूर्तिकार व खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. कारण, पीओपीपेक्षा शाडूच्या मूर्ती महाग असल्याने खरेदीदार पीओपीच्या मूर्ती खरेदीलाच पसंती देत आहेत.
--
चौकट .....................
४८ तासांत विरघळते मूर्ती
खाण्याचा सोडा बाजारात पॅकिंगमध्ये १५ रुपये (१०० ग्रॅम) मिळतो, तर सुट्या विक्रीत ५४ रुपये किलोने विकली जाते. घरी बादलीत पाणी घेतल्यावर त्यात मूर्तीच्या वजनाएवढाच खाण्याचा सोडा मिसळा व त्यानंतर पीओपीच्या मूर्तीचे विसर्जन करावे. ४८ तासात ती मूर्ती विरघळून जाते, अशी माहिती मूर्तिकारांनी दिली.
(जोड................ आहे)