इस्लामिक पेहरावात नमाजी टोपीला महत्त्व
By Admin | Published: June 24, 2017 11:26 PM2017-06-24T23:26:38+5:302017-06-24T23:32:54+5:30
हिंगोली : रमजान ईद म्हणजे महिनाभर ठेवलेल्या उपवासाचे फळ. ईदनिमित्त तयारी अगदी महिनाभरपासून सुरु असते. त्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : रमजान ईद म्हणजे महिनाभर ठेवलेल्या उपवासाचे फळ. ईदनिमित्त तयारी अगदी महिनाभरपासून सुरु असते. त्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र इस्लामिक पेहरावात नमाजी टोपीला महत्त्व असल्याने टोपी खरेदीतून हजारोची उलाढाल होत असल्याचे चित्र शनिवारी पहावयास मिळाले.
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध प्रकारच्या टोप्या व अत्तरे विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे काजळही बाजारात दाखल झाले आहेत. दिवसेंदिवस होत असलेल्या बदलामुळे दरवर्षी टोप्यांमध्ये नावीन्यता येत आहे.
यंदा अनेक प्रकारच्या टोप्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. यामध्ये अब्दुला, इंडोनेशिया, तुर्की, अफगाणी, मलेशिया, गोंडा टोपी, मक्की, चिता जाळी, भुटा जाळी, कॉटन, जरी अशा विविध प्रकारच्या २० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत किमतीच्या टोप्या बाजारात विक्रीस आल्या आहेत.
महत्त्वाचे मानले जाणारे अत्तर ही मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. यामध्ये नाईट, सदफ, बैलक ऊद, मोगरा, गुलाब इ. प्रकारची अत्तरे विक्रीसाठी आली आहेत.
मुस्लिम बांधव अत्तर खरेदीसाठी सायंकाळच्या वेळेस एकच गर्दी करीत आहेत. ३० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत एका बाटलीची किंमत आहे. शिवाय, ईदसाठी लागणाऱ्या इतरही वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.