आरोग्यासाठी महत्वाचे; रेशनमध्ये मिळणार फोर्टिफाईड तांदूळ,शरीरातील लोहासाठी आहे उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 12:18 PM2022-12-23T12:18:56+5:302022-12-23T12:21:36+5:30

सर्वसामान्यांना पोषणमूल्यांचा डोस मिळावा, यासाठी हा तांदूळ वितरित करण्यात येत आहे.

Important for health; Fortified rice in the ration is useful for iron in the body | आरोग्यासाठी महत्वाचे; रेशनमध्ये मिळणार फोर्टिफाईड तांदूळ,शरीरातील लोहासाठी आहे उपयुक्त

आरोग्यासाठी महत्वाचे; रेशनमध्ये मिळणार फोर्टिफाईड तांदूळ,शरीरातील लोहासाठी आहे उपयुक्त

googlenewsNext

औरंगाबाद : सामान्यांना पोषक आहार मिळावा, त्यांच्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी अधिक पोषणमूल्य असलेला फोर्टिफाईड तांदूळ राज्यात जवळपास १७ जिल्ह्यांतील रेशन दुकानांतून वितरित केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात हा तांदूळ दोन महिन्यांपासून दिला जात आहे. उशिरा का होईना शासनाने औरंगाबाद जिल्ह्याचा या योजनेत समावेश केला आहे. अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना ऑक्टोबर, तर प्राधान्य कुटुंब कार्डधारकांना डिसेंबर महिन्यापासून फोर्टिफाईड तांदूळ दिला जात आहे. विविध जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स) असलेला हा तांदूळ काही प्रमाणात नियमित तांदळामध्ये मिसळला जातो.

एक किलो तांदळात फोर्टिफाईड किती?
फोर्टिफाईड तांदूळ व नियमित तांदूळ याचे प्रमाण १:१०० आहे. म्हणजेच पुरवठा करण्यात आलेल्या एक किलो तांदळामध्ये फोर्टिफाईड तांदळाचे १० ग्रॅम आहे.

सर्वसामान्यांना पोषणमूल्यांचा डोस
सर्वसामान्यांना पोषणमूल्यांचा डोस मिळावा, यासाठी हा तांदूळ वितरित करण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून २०२१-२२ पासून फोर्टिफाईड तांदळाचा पुरवठा केला जात असून, औरंगाबाद जिल्ह्यात दोन महिन्यांपासून सुरुवात झाली आहे.

फोर्टिफाईड तांदळामुळे वाढते लोह
विद्यार्थ्यांच्या आहारातील सूक्ष्म पोषकतत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी फोर्टिफाईड तांदूळ देण्यात येत आहे. यात पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाईड तांदूळ बनविण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळण्याच्या दृष्टीने तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे. फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, बी, झिंकचा या तांदळात समावेश आहे.

दोन महिन्यांपासून वाटप सुरू
जिल्ह्यातील १ हजार ८०२ रेशन दुकानांवर दोन महिन्यांपासून फोर्टिफाईड तांदूळ वाटप केला जात आहे. या तांदळात पोषकमूल्ये असून यामुळे बहुविध प्रथिनांचा आहार सामान्यांना मिळावा, असा उद्देश आहे. अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना सुरुवातीला हा तांदूळ देण्यात आला. आता प्राधान्य कुटुंब कार्डधारकांनादेखील हा तांदूळ दिला जात आहे.
- जिल्हा पुरवठा विभाग, औरंगाबाद.

Web Title: Important for health; Fortified rice in the ration is useful for iron in the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.