तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:02 AM2021-09-16T04:02:57+5:302021-09-16T04:02:57+5:30

औरंगाबाद : भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनीही तसे संकेत दिले आहेत. मात्र, तिसरी ...

Impossible to predict the third wave | तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधणे अशक्य

तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधणे अशक्य

googlenewsNext

औरंगाबाद : भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनीही तसे संकेत दिले आहेत. मात्र, तिसरी लाट येणारच नाही, असेही म्हणता येणार नाही. तिसऱ्या लाटेसाठी तयारी करण्यात आली असून, केंद्र सरकार त्यासाठी सज्ज आहे, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले.

वैद्य राजेश कोटेचा यांनी बुधवारी डाॅ. हेडगेवार रुग्णालयास भेट दिली. त्या वेळी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. प्रारंभी राजेश कोटेचा यांचा रुग्णालयातर्फे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयुष्य मंत्रालयाचे सल्लागार डाॅ. मनोज नेसरी, डाॅ. सतीश कुलकर्णी, डाॅ. अनंत पंढरे, डाॅ. राजश्री रत्नपारखी, डाॅ. अश्विनीकुमार तुपकरी आदी उपस्थित होते.

कोटेचा म्हणाले, देशभरात ५० खाटांचे १०५ आयुष रुग्णालये उभारण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे रुग्णालय उभारण्यात येतात. केंद्र सरकारकडून निधी दिला जातो, तर राज्य सरकार उभारणी केली जाते. राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यास औरंगाबादेतही हे रुग्णालय होईल. त्यादृष्टीने चर्चा केली जाईल. कोरोना प्रादुर्भावात इतर उपचार पद्धतींबरोबर आयुर्वेदानेही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अनेक अभ्यासातून ते सिद्ध झाले आहे, असे कोटेचा म्हणाले.

इंटिग्रेटिव्ह मेडिसिनची गरज

इंटिग्रेटिव्ह मेडिसिनची आज गरज असून त्यात मोठे काम करण्याची देशात क्षमता आहे. ‘वन नेशन, वन हेल्थ’चीही आवश्यकता आहे. आरोग्यासाठी एकच पद्धत पाहिजे. परंतु सध्या आयुर्वेद वेगळे चालते, ॲलोपॅथी वेगळी चालते. त्यामुळे सर्वानी एकत्रितपणे काम करावे, यासाठी देशात प्रयत्न सुरू असल्याचे कोटेचा म्हणाले. बाहेरून येणारे ज्ञान डोळे बंद करून स्वीकारले जाते. हे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

-------

फोटो ओळ...

आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा

Web Title: Impossible to predict the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.