'...तर लोक तुम्हाला हंड्याने मारतील', इम्तियाज जलील यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 04:33 PM2022-05-16T16:33:05+5:302022-05-16T16:39:57+5:30

Imtiaz Jaleel: "तुम्ही अनेक वर्षे शिवसेनेसोबत महापालिकेत सत्ता भोगली, तेव्हा पाण्याचा प्रश्न मिटवला नाही."

Imtiaz Jaleel: 'people will hit you with pots', Imtiaz Jaleel targets Devendra Fadnavis | '...तर लोक तुम्हाला हंड्याने मारतील', इम्तियाज जलील यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

'...तर लोक तुम्हाला हंड्याने मारतील', इम्तियाज जलील यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

औरंगाबाद:औरंगाबादमध्ये सध्या पाण्याचा मुद्दा गंभीर बनला आहे. या पाणी प्रश्नावरुन येत्या 23 मे रोजी भाजपने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान, यावरुन एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. 

'भाजपने नौटंकी बंद करावी'
आज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबदच्या पाणी प्रश्नावर भाष्य केलं. ''शहराचा पाणी प्रश्न खूप गंभीर झाला आहे. त्यावर बोलण्याची गरज आहे, ही मोर्चाची नौटंकी बंद करा. शहराचा पाणी प्रश्न अधिकाऱ्यांसोबत बसून सोडवण्याची गरज आहे. पण, भाजप त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. त्यांना यातही राजकारण करायचं आहे,'' असं जलील म्हणाले.

'लोकं तुम्हाला हांड्याने मारतील'
ते पुढे म्हणाले की, "इतके वर्षे तुम्ही शिवसेनेसोबत महापालिकेत सत्ता भोगली, तेव्हा पाण्याचा प्रश्न मिटवला नाही. तेव्हा तुम्ही शिवसेनेसोबत लुटून खाल्ले, आता नौटंकी सुरू आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देतो की, तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा. लोक तुम्हाला हंड्याने मारतील," असंही जलील म्हणाले.

'पाणी पट्टी व्याजासह परत करा'
यावेळी जलील यांनी पाणीपट्टीचे पैसे परत करण्याची मागणी केली. "नागरीकांना पाणी पुरवठा न करता आजपर्यंत वसूल केलेली कोट्यावधीची पाणी पट्टीची रक्कम व्याजासह परत करावी. भाजप शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत होती, मग त्यावेळेस हा प्रश्न का सोडवला नाही? तेव्हा पाणी पट्टी का माफ करण्यात आली नाही? जिल्हा प्रशासनाने तेव्हा पासून आजपर्यंत पाणी पट्टी वसुल न करता नागरीकांना पाणी पुरवठा होणेकरिता विविध उपाययोजना राबविणे गरजेचे होते, असे इम्तियाज जलील म्हणाले.

Web Title: Imtiaz Jaleel: 'people will hit you with pots', Imtiaz Jaleel targets Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.