परदेशी पर्यटकांनी औरंगाबादेत यायचे की नाही? चीनच्या अधिकाऱ्यांची बस रोखली, दंड लावला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 12:46 PM2023-02-01T12:46:45+5:302023-02-01T12:48:29+5:30

भरधाव वाहने व वाहतूक कोंडीमुळे तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासगी बसला रात्री ११ वाजेनंतरच शहरातील जालना रोडवर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.

In Aurangabad Should foreign visitors, tourists come to the city or not? The bus of Chinese embassy officials was stopped | परदेशी पर्यटकांनी औरंगाबादेत यायचे की नाही? चीनच्या अधिकाऱ्यांची बस रोखली, दंड लावला

परदेशी पर्यटकांनी औरंगाबादेत यायचे की नाही? चीनच्या अधिकाऱ्यांची बस रोखली, दंड लावला

googlenewsNext

औरंगाबाद : जालना रोडवर खासगी प्रवासी बसला सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु टूरिस्ट बसला ‘नो एंट्री’च्या नावाखाली रोखण्याचा प्रकार होत आहे. दोन दिवसांपूर्वी चीनच्या दूतावासातील अधिकारी असलेली बस रोखण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी परदेशी पाहुणे असलेल्या बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे परदेशी पाहुणे, पर्यटकांनी शहरात यायचे की नाही, असा सवाल टूरिस्ट बसचालक उपस्थित करीत आहेत.

भरधाव वाहने व वाहतूक कोंडीमुळे तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासगी बसला रात्री ११ वाजेनंतरच शहरातील जालना रोडवर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. जी-२० अंतर्गत वूमन-२० परिषदेसाठी औरंगाबादेत फेब्रुवारीत विविध देशांतील प्रतिनिधी येणार आहेत. काही दिवसांपासून यासाठी तयारी सुरू आहे. पण या सगळ्यात दिवसा जालना रोडवरून देश-विदेशातील पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या टूरिस्ट बस वाहतूक पोलिसांकडून रोखण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी चीनचे अधिकारी असलेली बस तासभर थांबविण्यात आली. मंगळवारी परदेशी नागरिक असलेल्या बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पर्यटकांची संख्या वाढणार कशी?
या बसमध्ये चीनच्या दूतावासातील लोक होते. परंतु बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमित ट्रॅव्हल्स आणि टूरिस्ट बसमध्ये फरक आहे. दिवसा जर टूरिस्ट बस येऊ द्यायची नाही म्हटली, तर पर्यटकांची संख्या वाढणार कशी, असा सवाल आहे. टूरिस्ट बसला शहरात कधीही प्रवेश मिळावा.
- जसवंत सिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाैंडेशन.

ज्यांना परवानगी, त्यांच्यावर कारवाई नाही
दिवसा शहरात प्रवेश करण्यासाठी ट्रॅव्हल्स बससंदर्भात काही नियमावली आहे. त्या नियमानुसार वाहतूक पोलिस कारवाई करतात. दिवसा ज्या ट्रॅव्हल्स बसला शहरात प्रवेशाची परवागनी आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही. ज्यांना परवानगी नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. हा नियम सर्व ट्रॅव्हल्स बसला लागू आहे.
- दिलीप गांगुर्डे, प्रभारी, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग

Web Title: In Aurangabad Should foreign visitors, tourists come to the city or not? The bus of Chinese embassy officials was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.