धावत्या रिक्षात तरुणीसोबत चालकाचे संतापजनक कृत्य; स्पर्श करण्यापर्यंत गेली मजल

By सुमित डोळे | Published: July 8, 2023 08:04 PM2023-07-08T20:04:41+5:302023-07-08T20:06:01+5:30

तरुणीने अर्ध्या प्रवासात उतरत थेट गाठले पोलीस स्टेशन

In Chhatrapati Sambhaji Nagar driver's lewd act with young woman in running rickshaw; driver touches her | धावत्या रिक्षात तरुणीसोबत चालकाचे संतापजनक कृत्य; स्पर्श करण्यापर्यंत गेली मजल

धावत्या रिक्षात तरुणीसोबत चालकाचे संतापजनक कृत्य; स्पर्श करण्यापर्यंत गेली मजल

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा रिक्षात तरुण, महिलांचा प्रवासाच्या सुरक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रिक्षाचालकाने प्रवासी तरुणीला आक्षेपार्ह प्रश्न करुन स्पर्श करण्यापर्यंत मजल मारल्याची संतापजनक घटना ७ जुलै सायंकाळी चार वाजता घडली. शेख वसीम शेख सलीम (२६, रा. सब्जीमंडी) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. वारंवार घडणाऱ्या घटनेने मात्र पोलिसांच्या देखील भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

२१ वर्षीय स्नेहा (नाव बदलले आहे) शुक्रवारी शहरातून घरी जाण्यासाठी कार्तिकी सिग्नल वरुन रिक्षात (एच एच २०- ई एफ - १७४०) बसली होती. चालकाने मात्र काही वेळातच तिची चौकशी सुरू केली. एकामागे एक वैयक्तिक चौकशी सुरू केली. स्नेहाला त्याच्या प्रश्नाने अवघडल्यासारखे वाटले. सुरूवातीला तिने उत्तर देणे टाळले. मात्र, चालकाने नंतर थेट अश्लिल प्रश्न विचारायला सुरूवात केली. काहीतरी कारण करुन मागे हात करुन तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करु लागला. त्याचे वागणे कळाल्याने बाबा चौकातून बसलेला एक प्रवासी नगरनाक्याला उतरताच स्नेहाने तेथेच उतरण्याचे ठरवले.

....थेट पोलिस ठाणे गाठले
प्रवासी रिक्षात असताना वसीमने मागे हात करत स्नेहाला घाणेरडा स्पर्श केला. स्नेहाने मात्र धीर धरला. नगरनाक्यावर उतरुन तिने थेट पोलिस ठाणे गाठले. क्रांतीचौकचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. तर दुसरीकडे उपनिरीक्षक अमोल सोनवणे यांना चालकाला शोधण्याच्या सुचना केल्या. सोनवणे यांनी अडीज तासात वसीमला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Web Title: In Chhatrapati Sambhaji Nagar driver's lewd act with young woman in running rickshaw; driver touches her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.