छत्रपती संभाजीनगरच्या रत्यावर पोलिसच पोलीस; तब्बल ७ हजार २७० पोलिस तैनात,कारण काय?
By सुमित डोळे | Published: September 14, 2023 01:25 PM2023-09-14T13:25:28+5:302023-09-14T13:27:16+5:30
१४ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबर एकूण दिवस ४ बंदोबस्तास- ७ हजार २७० पोलिसांचा बंदोबस्त
छत्रपती संभाजीनगर : येत्या चार दिवसांमध्ये शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन असून यासाठी अति महत्त्वाच्या व्यक्ती शहरात येत आहेत. या सर्वांची सुरक्षा व बंदोबस्ताची जबाबदारी पोलिस विभागावर आहे. पहिल्यांदाच एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हीआयपी व कार्यक्रमांची रेलचेल आहे. यासाठी येत्या चार दिवस ७ हजार २७० पोलिसांचा कडेकोट बंदाेबस्त राहील. यात प्रामुख्याने १० पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक व ३० उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत हे सर्व हजर झाल्यानंतर जबाबदारीचे वाटप होणार आहे.
काय आहे दोन-तीन दिवसांत?
१६ सप्टेंबर मंत्रिमंडळ बैठक
१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृतमहोत्सव
बंदोबस्त कधीपासून?
१४ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबर एकूण दिवस ४ बंदोबस्तास- ७ हजार २७० पोलिस यात ४ हजार २७० पोलिस बाहेरील जिल्ह्यातून येणार
कोण कोण येणार?
मंत्रिमंडळ बैठकीस : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळ, आमदार, उच्चपदस्थ अधिकारी
मुक्तिसंग्राम दिनास : भारताचे सरन्यायाधीश डी वाय. चंद्रचूड, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सर्वोच्च न्यायालयाच्या मुंबई, कर्नाटक व मद्रासच्या खंडपीठातील न्यायमूर्ती, देशाचे अतिरिक्त महाअधिवक्ता
शहर पोलिसांचा बंदोबस्त
पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उपायुक्त, ५ सहायक आयुक्तांसह, २५ पोलिस निरीक्षक, ९६ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक असा एकूण ३ हजार २०० पोलिस सलग तीन दिवस बंदोबस्तात असतील.
बाहेरून आलेले अधिकारी किती?
१० पाेलिस अधीक्षक-अपर अधीक्षक, ३० सहायक आयुक्त /उपाधीक्षक, १६० पोलिस निरीक्षक, ४०० सहायक निरीक्षक / उपनिरीक्षक, पुरुष कर्मचारी २५००, तर महिला कर्मचारी ३००, वाहतूक पोलिस अधिकारी २०, वाहतूक कर्मचारी १५०, होमगार्ड ५००, एसआरपीएफचे ४ प्लाटून, ६ बॉम्ब शोधक नाशक पथक बुधवारपासून शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली.