अबब ! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसंख्येच्या अर्धी वाहने, रोज २३१ नवीन गाड्या रस्त्यावर
By संतोष हिरेमठ | Published: July 29, 2024 07:33 PM2024-07-29T19:33:29+5:302024-07-29T19:33:48+5:30
लोकसंख्या ३६ लाख, वाहने १७ लाखांवर, जिल्ह्यात ८५ टक्के वाहने दुचाकी अन् चारचाकीच
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील लोकसंख्या ३६ लाखांवर गेली आहे. या लोकसंख्येच्या अर्धी म्हणजे तब्बल १७ लाख ५२ हजार वाहने जिल्ह्यातील रस्त्यांवर धावत आहेत. त्यातही जिल्ह्यात ८५ टक्के वाहने ही फक्त दुचाकी, चारचाकी आहेत, हे विशेष. गेल्या पाच वर्षांत ३.७२ लाख नवी वाहने रस्त्यांवर आली असून, वाहनांची संख्या पाहता एका व्यक्तीमागे दोन वाहने असल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत प्रथमच २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रथमच नव्या चारचाकींची संख्या १० हजारांवर गेली. दुचाकी खरेदीचे प्रमाण आता वाढत आहे.
रोज २३१ नवीन वाहने रस्त्यावर
जिल्ह्यात दररोज २३१ नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या ही १३ लाखांवर होती. आता ही संख्या १७ लाखांवर गेली आहे.
जिल्ह्यात कोणत्या वर्षी किती नवीन वाहने
वर्ष- वाहनसंख्या
२०१८-१९ : ९१,८७४
२०१९-२० : ८२,८२६
२०२०-२१ : ६०,२४२
२०२१-२२ : ६५,०५१
२०२२-२३ : ८०,१९९
२०२३-२४ : ८४, ३६६
मे २०२४ : ७,२२३
जून २०२४ : ६,५८३
कोणत्या वर्षी किती नवीन दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर?
वर्ष- दुचाकी- चारचाकी-
२०१८-१९ : ७१,७८१-८,७२५
२०१९-२० : ६५,७३९-८,४०४
२०२०-२१ : ४४,८०० -८,२५४
२०२१-२२ : ४७,२३५-९,१३०
२०२२-२३ : ६१,०९५-८,६७९
२०२३-२४ : ६३,०४६-१०,३८८
मे २०२४ : ५,३४६-९१२
जून २०२४ : ८,४१३-१,१५५
वर्षनिहाय जिल्ह्यातील एकूण वाहनसंख्या
वर्ष- एकूण वाहने
२०१८-१९ : १३,७९,४६२
२०१९-२० : १४,६२,२८८
२०२०-२१ : १५,२२,५३०
२०२१-२२ : १५,८७,५८१
२०२२-२३ : १६,६७,७८०
२०२३-२४ : १७,५२,१४६
जिल्ह्यातील वाहनांची सध्याची स्थिती
एकूण वाहने : १७,५२,१४६
चारचाकी वाहने : १,२६,९७०
दुचाकी वाहने : १३,६८,२१३
रिक्षा : ३८,४५५
स्कूल बस : १,१५४
मिनी बस : २,९१९
रुग्णवाहिका : ५९८