फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटो बायोग्राफी छत्रपती संभाजीनगरात

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 9, 2024 07:33 PM2024-08-09T19:33:20+5:302024-08-09T19:37:00+5:30

फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटोबायोग्राफी; देशातील एकमेव ‘भारतमाता मंदिर’ छत्रपती संभाजीनगरात

In Chhatrapati Sambhajinagar Photo biographies of 100 revolutionaries of the country hanged, blown up by cannon | फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटो बायोग्राफी छत्रपती संभाजीनगरात

फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटो बायोग्राफी छत्रपती संभाजीनगरात

छत्रपती संभाजीनगर : 
‘‘कशास आई भिजिवसी डोळे, उजळ तुझेभाळ,
रात्रीच्या गर्भात उद्याचा, असे उष:काल

सरणावरती आज आमुची, पेटताच प्रेते
उठतील या ज्वाळातून, भावी क्रांतीचे नेते

लोहदंड तव पायामधले, खळाखळा तुटणार आई
खळाखळा तुटणार, गर्जा जयजयकार क्रांतीचा’’

भारतमातेला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी ज्या क्रांतिवीरांनी आपले बलिदान दिले. त्यांची शौर्य गाथा अशा वरील शब्दांत ‘भारतामाता मंदिरात लिहून ठेवली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी फाशावर चढले, त्यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले अशा देशातील निवडक १०० क्रांतिवीरांचे फोटो व माहिती असणारे हे ‘क्रांतिवीरांचे मंदिर’ (भारतमाता मंदिर) देशातील एकमेव ठरत आहे. मात्र, योग्य प्रचार-प्रसार होत नसल्याने याची माहिती पर्यटक सोडा शहरातील सर्व नागरिकांपर्यंतही पोहोचली नाही.

क्रांतिवीर राणी चन्नमा ते राजेंद्र लाहिरीपर्यंत
भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा कुणी केला असेल तर त्या राणी चन्नमाने. १८२४ला कनार्टकातील कित्तूरचे संस्थान इंग्रजांनी ताब्यात घेताच. त्याविरुद्ध पुरुषवेश परिधान करुन, इंग्रजांवर तुटून पडणाऱ्या या महान राणीने शेकडो इंग्रजांना कंठस्नान घातले. त्यांना दि. ३ डिसेंबर १८२४ इंग्रजांनी शिक्षा देत तोफेच्या तोंडी दिले. या पहिल्या फोटोपासून ते राजेंद्र लाहिरी ते रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिसंघटनेत होते. त्यांनी अनेक क्रांतियोजना यशस्वी केल्या. त्यांना दि. १७ डिसेंबर १९२४ रोजी गोंडा येथे फाशी देण्यात आली. या १०० वर्षांतील १०० क्रांतिकारकांच्या फोटोसह माहिती ‘भारतमाता मंदिर’मध्ये बघण्यास मिळते. येथे भारतमातेची मोठी मूर्ती सर्वांचे लक्षवेधून घेते.

प्रत्येक शहरवासीयांनी ‘प्रचारक’ बनण्याची गरज
स्वातंत्र्याला ५० वर्षेपूर्ण झाल्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने भारतमाता मंदिर उभारण्यात आले. या मंदिराला. येत्या डिसेंबर महिन्यात २५व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या मंदिराची मूळ संकल्पना माजी नगरसेवक संजय जोशी यांची. त्यांनी वर्षभर तिहार जेल, येरवडा जेल व नागपूर जेलमध्ये जाऊन तिथून क्रांतिवीरांचे फोटो जमा केले व विविध ऐतिहासिक पुस्तक वाचून त्यातून माहिती मिळविली. दरवर्षी १४ ते १५ हजार लोक या मंदिराला भेट देतात. भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढविण्यासाठी प्रत्येक शहरवासीयाने पहिले हे भारतमाता मंदिर बघावे त्यांतर त्याचा प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन संजय जोशी यांनी केले.

शहरावासीयांनी काय करायला पाहिजे?
१) भारतमाता मंदिरात शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन यावी.
२) बाहेरील शाळांच्या सहली येथे येतील यासाठी प्रयत्न करावे.
३) एमटीडीसीने देश-विदेशांतील पर्यटकांच्या नियोजनात या भारतमाता मंदिराचा समावेश करावा.
४) शहरातील सामाजिक संस्था, मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने मंदिराला भेट द्यावी.
५) शहरावासीयांनी आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आवर्जून हे मंदिर दाखवावे.

Web Title: In Chhatrapati Sambhajinagar Photo biographies of 100 revolutionaries of the country hanged, blown up by cannon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.