छत्रपती संभाजीनगरमध्ये चार दिवसात हजारांवर नागरिकांना नेत्र संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2023 02:04 PM2023-08-02T14:04:52+5:302023-08-02T14:04:59+5:30
एकाच दिवसात आढळले दोनशेपार रुग्ण
डोळ्याच्या साथीचा प्रसार झपाट्याने होत असून शहरात अवघ्या चार दिवसांत ११९२ जणांना लागण झाली आहे. एकाच दिवसात महापालिकेच्या आरोग्य केंद्रात डोळ्याच्या साथीचे दोनशेच्या पेक्षा जास्त उपचारासाठी आल्याची नोंद झाली आहे. सिडको एन 8 येथील दवाखान्यामध्ये दररोज शंभर रुग्णांमधून पंधरा ते वीस रुग्ण डोळ्यांचे निघत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. जोगदंड यांनी दिली आहे.
राज्यभर डोळे येण्याचा संसर्ग पसरला आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील डोळ्यांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य शासनाने डोळे आलेल्या व्यक्तींची नोंद ठेवण्याची सूचना महापालिकेंना केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या 40 आरोग्य व दवाखान्यांमधून ही नोंद ठेवली जात असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले आहे. यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांची कार्यक्रम म्हणून अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
दिवसभरात डोळ्याच्या साथीचे नवीन 20 ते 22 रुग्ण येत आहेत, असे यावेळी पारस मंडलेचा यांनी सांगितले. याबरोबरच लोकांच्या संपर्कात जास्त येऊ नये, वारंवार चेहऱ्याला किंवा डोळ्याला हात लावणे टाळावे, स्वच्छता राखावी असे आवाहन देखील महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वांना करण्यात येत असल्याचे मांडलेचा म्हणाले.