मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी

By विकास राऊत | Published: June 26, 2024 05:59 PM2024-06-26T17:59:59+5:302024-06-26T18:00:21+5:30

नागरिकांची पाण्यासाठी वणवण : जून महिन्यात पाऊस होऊनही प्रकल्पांना पाणी नाही

In Marathwada for water even during monsoon; 1696 water tankers in 1628 villages | मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी

मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाने जून महिन्यातील सरासरी गाठल्याचे आकडे सांगत असताना एकूण लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक अजूनही टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहेत.

मराठवाड्यात पावसाळ्यात १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. विभागात पाणीटंचाईचे संकट कमी होत लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांत सुमारे १५ टक्के जलसाठा आहे. मेच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १८ मेपर्यंत १८३७ पर्यंत टँकरचा आकडा होता. आता १९ जूनपर्यंत १९३८ टँकरचा आकडा आहे. २४ जून पर्यंत १६९६ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता.

जूनअखेरीस १६९६ टँकरचा आकडा
जानेवारीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९, जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ३१९ वर गेली. मार्च ४३५, एप्रिल १४२४ व मे महिन्यात १८३७ वर टँकरचा आकडा गेला. जून महिन्यात १९३८ टँकर सुरू झाले. जूनअखेरपर्यंत त्यात घट झाली; परंतु ग्रामीण भागात पाणीटंचाई आहेच. ३९४२ विहिरींचे अधिग्रहण कायम आहे.

११६५ गावे, ४९३ वाड्यांवर टंचाई
सध्या ११६५ गावे आणि ४९३ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. नियमित पावसाळा सुरू असूनही ग्रामस्थांचे पाण्याविना हाल आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४३४ गावे व ७३ वाड्या, जालना ३१५ गावे व ९२१ वाड्या, परभणीत २५ गावे व ७ वाड्या, हिंगोली ३ गावे व ५ वाड्या, नांदेड ११ गावे आणि २९ वाड्या, बीड २८३ गावे व २७१ वाड्या, लातूर १९ गावे आणि १६ वाड्या, तर धाराशिव जिल्ह्यात ७४ गावांत टंचाई आहे.

जिल्हानिहाय टँकर संख्या
छत्रपती संभाजीनगर.......... ६९०
जालना.......... ४८८
परभणी.............३३
हिंगोली ..........५
नांदेड.............. ३९
बीड ..............३०५
लातूर...........२८
धाराशिव........... १०८
एकूण ...........१६९६

जूनची सरासरी पूर्ण, प्रकल्प कोरडेच
मराठवाड्यात पाऊस बरसत असला तरी मोठ्या, लघू आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होत नसल्यामुळे पाणीटंचाईचे सावट अद्याप कायम आहे. विभागाच्या वार्षिक ६७८ मि.मी. सरासरीच्या तुलनेत आजवर १६९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात किमान १७० मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. मंगळवारी सकाळपर्यंत १.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. मोठ्या धरणांत १२.९२ टक्के जलसाठा आहे. तर लघू आणि मध्यम प्रकल्पांत ३ टक्के जलसाठा आहे.

विभागात आजवर झालेला पाऊस
जिल्हा .........................पाऊस

छत्रपती संभाजीनगर........१९० मि.मी.
जालना .....             १८६ मि.मी.
बीड............             १७७ मि.मी.
लातूर.......... २०९ मि.मी.
धाराशिव.......... २१२ मि.मी.
नांदेड.........             ११५ मि.मी.
परभणी............ १५१ मि.मी.
हिंगोली............ ११९ मि.मी.
एकूण................ १६९ मि.मी.

Web Title: In Marathwada for water even during monsoon; 1696 water tankers in 1628 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.