मराठवाड्यात महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत उद्धवसेना मोठा भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 04:09 PM2024-10-31T16:09:18+5:302024-10-31T16:10:29+5:30

भाजपने गेल्यावेळी लढवलेल्या परळी, अहमदपूर, पाथरी आणि अहमदपूर या जागा राष्ट्रवादी (अप)ला दिल्या आहेत.

In Marathwada, the BJP is in the Grand Alliance and the Uddhav Sena is the elder brother in the Maha Vikas Aghadi | मराठवाड्यात महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत उद्धवसेना मोठा भाऊ

मराठवाड्यात महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत उद्धवसेना मोठा भाऊ

- नजीर शेख
छत्रपती संभाजीनगर :
विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील ४६ पैकी २० मतदारदारसंघांत उमेदवारी जाहीर करून भाजपने आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले आहे. असे असले तरी २०१९ च्या तुलनेत भाजपला ४ जागा कमीच मिळाल्या आहेत. शिंदेसेना १६ जागा लढवणार असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ०९ मतदारसंघ मिळाले आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीत मराठवाड्यापुरता उद्धवसेना हा थोरला भाऊ ठरला आहे. उद्धवसेना ४६ पैकी १७ जागा लढवत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शप)ने प्रत्येकी १५ जागांवर उमेदवार दिले आहेत.

महायुतीमध्ये गंगाखेडची एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत परांडामध्ये उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शप) या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले आहेत. लोह्यामध्येही महाविकास आघाडीतील शेकाप आणि उद्धवसेना या दोन्ही पक्षांचे उमेदवार आहेत. या दोन मतदारसंघांत ४ नोव्हेंबरला कोणता पक्ष माघार घेतो किंवा तिथे मैत्रीपूर्ण लढत होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या चार जागा अजित पवार गटाला
२०१९ च्या निवडणुकीत तत्कालीन युतीमध्ये मराठवाड्यात भाजपच मोठा भाऊ होता. त्यावेळी भाजपने २४ जागा लढविल्या होत्या, तर शिवसेनेचे २२ जागी उमेदवार होते. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीत काँग्रेसने २१, तर राष्ट्रवादी काँग्रेसने २२ जागी उमेदवार दिले होते. रासप आणि शेकापने एका जागेवर उमेदवार दिला होता. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचेही मोठ्या संख्येने उमेदवार होते. भाजपने गेल्यावेळी लढवलेल्या परळी, अहमदपूर, पाथरी आणि अहमदपूर या जागा राष्ट्रवादी (अप)ला दिल्या आहेत.

२०१९ ची आकडेवारी पक्ष उमेदवार आमदार
भाजप २४ १६
शिवसेना             २२             १२
काँग्रेस             २१             ०८
राष्ट्रवादी             २२             ०८
रासप             ०१             ०१
शेकाप             ०१             ०१
एमआयएम  १०             ००
वंचित बहुजन आघाडी             ४४         ००

Web Title: In Marathwada, the BJP is in the Grand Alliance and the Uddhav Sena is the elder brother in the Maha Vikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.