शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात संजय शिरसाट- राजू शिंदे यांच्यात अटीतटीचा सामना 

By बापू सोळुंके | Published: November 14, 2024 03:06 PM2024-11-14T15:06:20+5:302024-11-14T15:07:15+5:30

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ; साळवे, गायकवाड यांच्या मतांवर शिरसाट - शिंदेंचे भवितव्य

In Shiv Sena's stronghold Aurangabad Central, Sanjay Shirsat- Raju Shinde is in a close match  | शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात संजय शिरसाट- राजू शिंदे यांच्यात अटीतटीचा सामना 

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात संजय शिरसाट- राजू शिंदे यांच्यात अटीतटीचा सामना 

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात यंदा प्रथमच दोन शिवसेनेत अटीतटीचा सामना होत आहे. शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर मागील निवडणुकीत शिरसाट यांना टक्कर देणारे राजू शिंदे यांना उद्धवसेनेने मैदानात उतरविले आहे. दोन्ही उमेदवारांकडे आपापली ‘व्होट बँक’ आहे. वंचित बहुजन आघाडीचे अंजन साळवे, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संदीप शिरसाट आणि रिपाइं डेमोक्रेटिक पार्टीचे रमेश गायकवाड यांच्यासह १८ अपक्ष उमेदवार किती मते घेतात, यावर या मतदारसंघातील लढतीचे भवितव्य ठरणार आहे.

आ. शिरसाट यांची जमेची बाजू
- तीन टर्मपासून मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व.
- मतदारसंघात सुमारे ८०० कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा.
- उद्धवसेनेतील अनेक प्रमुख पदाधिकारी सोबत.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळख.
- लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते.

आ. शिरसाट यांची उणे बाजू
-पंधरा वर्षांपासून आमदार, मात्र केवळ दोन वर्षातच विकासकामे.
-मतदारसंघात कमी आणि मुंबईतच अधिक काळ राहात असल्याचा विराेधकांचा आरोप.
-मातोश्रीची साथ सोडल्याने शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांत नाराजी.
-पंधरा वर्षानंतरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात अपयश.
-गुंठेवारीमध्ये बसलेल्या लघु उद्योजकांच्या समस्या न सोडविल्याने नाराजी.

राजू शिंदे यांची जमेची बाजू
- एमआयएमने उमेदवार न दिल्याने मुस्लीम समाजाची मते मिळण्याची अपेक्षा.
- मागील निवडणुकीत पराभवामुळे यावेळी तयारीनिशी निवडणूक रिंगणात.
- शिंदे हे मूळचे भाजपचे असल्याने या पक्षाचा त्यांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा.
- जरांगे फॅक्टरवर मदार.

शिंदे यांची उणे बाजू
- मतदारसंघाबाहेरील उमेदवार असल्याचा विरोधकांचा आरोप.
- उद्धवसेनेचे पदाधिकारी शिंदेसेनेत गेल्याने खिळखिळे झालेले पक्षसंघटन.
- भाजपमधून येऊन उमेदवारी मिळविल्याने उद्धवसेनेतील इच्छुकांची नाराजी.
- मतदारसंघाची भौगोलिक रचना मोठी यामुळे शिंदे यांची दमछाक.
- पक्षातील अंतर्गत गटबाजी.

लोकसभेत पश्चिममध्ये कुणाला किती मते
शिंदेसेनेला सर्वाधिक मतदान-९५,५८६
उद्धवसेनेला मिळालेली मते-५८,३८२
एमआयमएम पक्षाला मिळालेली मते-५४,८१७
वंचित बहुजन आघाडीला मिळालेली मते-१६,००२

पश्चिममधील एकूण मतदार- ४,०७,०९७
पुरुष मतदार-२,१२,४९५
महिला मतदार-१,९४,५२५
लष्करी सेवेतील मतदार-१४१
तृतीयपंथीय उमेदवार-७७

Web Title: In Shiv Sena's stronghold Aurangabad Central, Sanjay Shirsat- Raju Shinde is in a close match 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.