४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:03 AM2021-09-25T04:03:27+5:302021-09-25T04:03:27+5:30

औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी सकाळी १० वाजता ...

Inauguration of 41st Marathwada Sahitya Sammelan today | ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

googlenewsNext

औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी सकाळी १० वाजता होणार आहे. यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रांगणातील यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी सज्ज झाली आहे.

देगलूर येथील ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनात पहिल्या दिवशी संत जनाबाई व्यासपीठावर उद्घाटनाचा सोहळा तीन तास चालणार आहे. त्यानंतर याच व्यासपीठावर निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. सायंकाळी पाच ते सात वाजेदरम्यान ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर आली आहे’ या विषयावर पहिला परिसंवाद होणार आहे. यात ‘लोकमत’चे संपादक नंदकिशोर पाटील यांच्यासह, संजय आवटे, अलका धूपकर, रवींद्र केसकर, वैजीनाथ अनमुलवाड सहभागी होतील. याचवेळी दुसऱ्या प्र. ई. सोनकांबळे व्यासपीठावर सु. ग. चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली ‘आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर’ या विषयावर परिसंवादाचे दुसरे पुष्प गुंफले जाईल. यात दीपा श्रीरसागर, राम रौनेकर, रवींद्र बेंबरे, संजय जगताप आणि मोहीब कादरी हे सहभागी होणार आहेत. रात्री सात ते नऊ दरम्यान संत जनाबाई व्यासपीठावर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. दरम्यान, सकाळी ९.३० वाजता मावळते अध्यक्ष डॉ. ऋषीकेश कांबळे यांच्या हस्ते श्याम देशपांडे ग्रंथनगरीत ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन होणार असल्याचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी सांगितले.

चौकट,

परिसराचे निर्जंतुकीकरण

या संमेलनात कोरोनासंबंधी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. मास्कशिवाय सभागृहात प्रवेश देण्यात येणार नाही. शारीरिक अंतर राखणे बंधनकारक केले असून, दोन्ही सभागृहे आणि परिसराचे निर्जंतुकीकरण केले. सभागृहात शारीरिक अंतर राखले जाईल अशा प्रकारची आसनव्यवस्था करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Inauguration of 41st Marathwada Sahitya Sammelan today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.