सिल्लोड तालुक्यात ६.७२ कोटींच्या विकासकामांना शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:04 AM2021-09-21T04:04:32+5:302021-09-21T04:04:32+5:30
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाकडून सर्वाधिक निधी आणण्यात आला आहे. रस्ते व गावात सुशोभीकरणासह सर्वसमावेशक विकास कामे ...
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाकडून सर्वाधिक निधी आणण्यात आला आहे. रस्ते व गावात सुशोभीकरणासह सर्वसमावेशक विकास कामे करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विकासकामे सुरू करण्यात आली आहेत, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी जि. प. माजी उपाध्यक्ष केशव तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, डॉ. संजय जामकर, मार्केट कमिटीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, डॉ. मच्छिंद्र पाखरे, संचालक राजेंद्र ठोंबरे, सतीश ताठे, नायब तहसीलदार रतनसिंग सालोक, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, जि. प. बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कल्याण भोसले, जी. आर. पाटील यांची उपस्थिती होती. विविध गावात विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.
.
200921\img_20210920_104928.jpg
क्याप्शन
लोणवाडी येथे महिला आघाडीच्या कार्यकारिणीच्या नाम फलकाचे उदघाटन करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिसत आहे