आयकॉन स्टील प्रस्तुत ‘लोकमत प्रॉपर्टी शो’चे आज उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:02 AM2021-02-19T04:02:01+5:302021-02-19T04:02:01+5:30
औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद शहरात व आसपासच्या परिसरात आपण घर खरेदी करण्यास इच्छुक आहात, मग विचार कसला करता. ...
औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद शहरात व आसपासच्या परिसरात आपण घर खरेदी करण्यास इच्छुक आहात, मग विचार कसला करता. उद्या शुक्रवारी, १९ फेब्रुवारीला ‘आयकॉन स्टील प्रस्तुत लोकमत प्रॉपर्टी शो २०२१’चे उद्घाटन होणार आहे. या गृह प्रदर्शनातच तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरासाठी बहुपर्याय मिळणार आहेत.
जालना रोडवरील लोकमत भवन येथे सकाळी १०.३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, आयकॉन स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी, औरंगाबाद क्रेडाईचे अध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा व क्रेडाईचे अध्यक्ष (इलेक्ट) नितीन बगडिया यांची उपस्थिती राहणार आहे.
या प्रदर्शनात शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या १०० पेक्षा अधिक गृह प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.
यात बंगलोज, रो-हाऊसेस, लक्झरी फ्लॅटस्, पेंट हाऊस, फार्म हाऊस, शोरूम, शॉप्स, ऑफिसेस, गोडाऊन व ओपन प्लॉटस् उपलब्ध असणार आहेत व बुकिंग येथेच करण्यात येणार आहे.
सर्व स्तरांतील ग्राहकांच्या बजेटनुसार घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एवढेच नव्हे, तर ग्राहकांना पसंत पडलेल्या गृह प्रकल्पांना लगेच भेट देण्यासाठी बांधकाम व्यावसायिक वाहनाची व्यवस्थाही करणार आहे. प्रदर्शनात जे ग्राहक बुकिंग करतील त्यांना बांधकाम व्यावसायिक विशेष सवलत देणार आहेत. काहींनी प्रोत्साहनपर बक्षिसेही ठेवली आहेत. मग तयार राहा शुक्रवारी, १९ फेब्रुवारीला आपले स्वप्नपूर्ती करणारे गृह प्रदर्शन बघण्यासाठी. प्रवेश सर्वांना मोफत आहे.
हे गृह प्रदर्शन तीन दिवस म्हणजे रविवार, २१ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेदरम्यान सुरू राहील. ग्राहकांनी या संधीचा फायदा घ्यावा व बहुपर्यायांतून स्वतःचे हक्काचे घर बुक करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
चौकट
औरंगाबादसह पुण्यातील गृह प्रकल्पाची
माहिती प्रदर्शनात
या गृह प्रदर्शनात औरंगाबाद शहर व परिसरातील गृह प्रकल्पांची माहिती मिळणार आहे. त्याचसोबत येथील बांधकाम व्यावसायिकांनी पुण्यात बांधलेल्या गृह प्रकल्पाची माहितीही येथेच मिळणार असल्याने ग्राहकांच्या वेळेची व पैशाची मोठी बचत होणार आहे.
चौकट
भाग्यवान विजेत्यांना चांदीचे शिक्के
‘लोकमत प्रॉपर्टी शो २०२१’ला भेट देणाऱ्या ५ भाग्यवान विजेत्यांना रोज चांदीचा शिक्का व अनेक भेटवस्तू जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चौकट
सुरक्षेची संपूर्ण खबरदारी
‘लोकमत प्रॉपर्टी शो २०२१’ या प्रदर्शनात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शेठ नंदलाल धूत हॉस्पिटलतर्फे येथे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येकाची थर्मल गनने तपासणी करण्यात येईल. सॅनिटायझर लावण्यात येणार आहे. मास्क लावल्यावरच प्रदर्शनात प्रवेश देण्यात येणार आहे. लोकमत भवनमध्ये संपूर्ण प्रदर्शनाची सुटसुटीत मांडणी करण्यात आली आहे. चालण्यासाठी मोकळी जागा सोडण्यात आली आहे.
चौकट
एकावेळी फक्त ५० जणांनाच प्रवेश
घर खरेदीदारांची संख्या मोठी आहे. गृह प्रदर्शनात होणारी गर्दी लक्षात घेता एकाच वेळी फक्त ५० नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. याप्रमाणे ठरावीक वेळेच्या अंतराने ५०-५० नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे.