एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कृषी महोत्सव उद्घाटन; दानवे अन् कराड यांचीही उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 08:12 PM2023-01-01T20:12:32+5:302023-01-01T20:15:01+5:30

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील महाराणा प्रतापसिंह चौक परिसरात येत्या १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२३पर्यंत राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव २०२३चे आयोजन करण्यात आले आहे.

Inauguration of State Level Agricultural Festival in the presence of CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कृषी महोत्सव उद्घाटन; दानवे अन् कराड यांचीही उपस्थिती

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कृषी महोत्सव उद्घाटन; दानवे अन् कराड यांचीही उपस्थिती

googlenewsNext

राज्यस्तरीय कृषी महोत्सव उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. सिल्लोड येथील राज्य स्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्टॉल ला भेट देऊन लगेच बाहेर गेले सभा रद्द करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील महाराणा प्रतापसिंह चौक परिसरात येत्या १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२३पर्यंत राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे हस्ते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, पालक मंत्री संदीपान भुमरे  यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

या महोत्सवात एकूण ६०० दालने असणार आहेत. तसेच सायंकाळी शेतकऱ्यांसाठी आणि महोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विविध प्रबोधानात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवास भेट देऊन येथील चर्चासत्रे, प्रदर्शन, प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहेत.  यावेळी नाशिक जिल्हा त झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्व भूमीवर मुख्य मंत्र्यांनी सभा रद्द करण्यात आली आहे. राज्यभरातील जवळपास १० लाख शेतकरी या महोत्सव आणि प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज आहे.

आगामी वर्ष हे आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२३ हे वर्ष भरड धान्यांचं म्हणून साजरे होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राची भुमिका, महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे कार्यक्रम यावरही महोत्सवातील चर्चासत्रांमधून विचारमंथन होणार आहे. महोत्सवात कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही चर्चासत्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

Web Title: Inauguration of State Level Agricultural Festival in the presence of CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.