वाळूजमहानगरात दोन कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:02 AM2021-02-12T04:02:57+5:302021-02-12T04:02:57+5:30
वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात गुरुवारी दोन खासगी रुग्णालयात कोविड लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी १४६ जणांना कोविडची ...
वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात गुरुवारी दोन खासगी रुग्णालयात कोविड लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी १४६ जणांना कोविडची लस देण्यात आली.
दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या वाळूजमहानगरातील दोन खासगी रुग्णालयांत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी पंढरपुरातील तिरुपती हॉस्पिटल येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन जि. प. सदस्य रमेश गायकवाड तर बजाजनगरातील माणिक हॉस्पिटलमध्ये जि. प. सदस्या ज्योती चोरडिया, रेखा नांदूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते, डॉ. संग्राम बामणे, वाळूजमहानगर डॉक्टर्स असोसिएशनचे समन्वयक डॉ. विलास भाकरे, उपाध्यक्ष डॉ. दिगंबर माके, पंढरपूरचे माजी सरपंच शेख अख्तर, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. सचिन चिटणीस आदींची उपस्थिती होती. डॉ. शेळके यांनी डॉ. भाकरे यांना लस देऊन या मोहिमेचा प्रारंभ केला. डॉ. प्रज्योत पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आदर्श वाटगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जि. प. च्या आरोग्य सहायक लघाने, डॉ. मतीन, डॉ. राजेश्वरी खिस्से, डॉ. लोकणीकर, एस. आर. गायकवाड आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ- पंढरपुरात कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करताना जि.प.सदस्य रमेश गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, डॉ.संतोष कुलकर्णी, शेख अख्तर आदी दिसत आहेत.