भवन सर्कलमधील विविध विकासकामांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:06 AM2021-09-26T04:06:11+5:302021-09-26T04:06:11+5:30
बोरगाव येथील पूर्णा नदीवरील पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, पूर्णा नदीवरील केटीवेअरचे रूपांतर स्वयंचलित बॅरेजेस मध्ये करू. ...
बोरगाव येथील पूर्णा नदीवरील पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, पूर्णा नदीवरील केटीवेअरचे रूपांतर स्वयंचलित बॅरेजेस मध्ये करू. यामुळे नदीलगतच्या गावांचा रस्त्यांचा प्रश्न मिटेल. शिवाय सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, असे सत्तार यांनी कार्यक्रमप्रसंगी सांगितले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, नंदकिशोर सहारे, मारुती वराडे, विजय खाजेकर, विश्वास दाभाडे, ना. तहसीलदार शैलेश पटवारे, मंडळ अधिकारी एस. एम. जैस्वाल, जि. प. बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता कल्याण भोसले, मुख्यमंत्री सडक योजनेचे सुनील गुडसुरकर, जीवरग टाकळीचे परमेश्वर जीवरग, भास्कर फुके, गणेश जीवरग, विश्वनाथ महाराज फुके, अशोक जीवरग, मधुकर फुके, रामराव जीवरग यांची उपस्थिती होती.
250921\img_20210925_185135.jpg
क्याप्शन
कायगाव येथे विकास कामाचे उदघाटन करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार सोबत पदाधिकारी दिसत आहे.