जुल्फिकार हुसेन मोहल्ला लायब्ररीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:05 AM2021-03-14T04:05:31+5:302021-03-14T04:05:31+5:30
मस्जिदीमध्ये ग्रंथालय सुरू करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. मरयम मिर्जा अभियान मोहल्ला बाल वाचनालयांतर्गत ...
मस्जिदीमध्ये ग्रंथालय सुरू करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
मरयम मिर्जा अभियान मोहल्ला बाल वाचनालयांतर्गत हे ९वे वाचनालय होय. गरीब वस्तीतील मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने सहावीच्या उर्दू माध्यमाच्या मुलीने ‘मोहल्ला लायब्ररी’ संकल्पना मांडली. ‘रीड अँड लीड फाउंडेशन’ आणि फेम या संस्थेंच्या मदतीने विविध भागांत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सय्यद सलीम अली यांनी या वाचनालयासाठी जागा उपलब्ध करून दिली. प्रारंभी रीड ॲड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांनी प्रास्ताविक केले.
प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना अनीसुर्रहमान नदवी, खान जमील अहमद (जिल्हा अध्यक्ष फेम ),
सय्यद मुख्तार कादरी आदींची उपस्थिती होती.
मौलाना शेख रिजवान यांनी सूत्रसंचालन, तर सय्यद अली यांनी आभार प्रदर्शन केले.