इन्स्पायर सायन्स कॅम्प २०१७ चे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:56 AM2017-11-22T01:56:30+5:302017-11-22T01:56:34+5:30

विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करून खºया अर्थाने स्वत:चे व देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करावे, अशा शब्दांत आयसीटी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री प्रो. डॉ. जी. डी. यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 Inception of Inspire Science Camp 2017 | इन्स्पायर सायन्स कॅम्प २०१७ चे उद्घाटन

इन्स्पायर सायन्स कॅम्प २०१७ चे उद्घाटन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करून खºया अर्थाने स्वत:चे व देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करावे, अशा शब्दांत आयसीटी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री प्रो. डॉ. जी. डी. यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत शासन प्रायोजित व पॉॅल हर्बट सेंटर फॉर डी. एम. ए. बारकोडिंग आणि बायोडायव्हर्सिटी स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इन्स्पायर सायन्स कॅम्प २०१७ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंगळवार, दि. २१ रोजी या कॅम्पचे थाटात उद्घाटन करण्यात आले. डॉ. यादव यांच्यासह डॉ. बा. आं. म. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे व इन्स्पायर डीएसटी दिल्लीचे सरचिटणीस डॉ. उमेश शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. सी. जे. हिवरे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, इन्स्पायर कॅम्पचे आयोजक डॉ. जी. डी. खेडकर यांची विशेष उपस्थिती होती.
२५ नोव्हेंबरपर्यंत सुरू असणाºया या कॅ म्पमध्ये औरंगाबादसह जालना, बीड या जिल्ह्यांतील २०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. उद्घाटनानंतर डॉ. शर्मा यांनी शासनातर्फे राबविल्या जाणाºया वैज्ञानिक उपक्रमांची व शिष्यवृत्तींची माहिती दिली.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. बी. ए. चोपडे यांनी वेरूळ-अजिंठा, तसेच विद्यापीठातील लेण्यांमधील विज्ञान विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, तसेच सुमारे २००० वर्षांपूर्वी मराठवाड्यात कार्यरत असणाºया अजिंठा विद्यापीठाविषयी माहिती दिली.
डॉ. जी. डी. खेडकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गुणवती आरक यांनी संचलन केले. अंजली ताटे यांनी आभार मानले. प्रा. शिवाजी घोडके, दिनेश नलगे, डॉ. अनिता टिकनाईक, चेतन अहिरे, चंद्रकांत जाधव, बाळासाहेब उघडे यांच्यासह अनेकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Web Title:  Inception of Inspire Science Camp 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.