‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या..!’ आरोग्यासाठी खिसा होतोय रिकामा
By संतोष हिरेमठ | Published: April 11, 2024 02:29 PM2024-04-11T14:29:03+5:302024-04-11T14:30:02+5:30
६५ टक्के शहरवासीयांचे १० टक्के उत्पन्न आरोग्यावर खर्च, विमा काढण्यावर भर
छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा होतो. यावर्षी या दिनाची ‘माझे आरोग्य, माझा हक्क’ ही संकल्पना आहे. या दिनानिमित्त ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ६५ टक्के शहरवासीयांना आपल्या उत्पन्नापैकी सुमारे १० टक्के रक्कम आरोग्यावर खर्च करावी लागत आहे. तर काहींचा हाच खर्च २५ टक्क्यांवर आहे. याच वेळी ५३ टक्के नागरिकांनी खासगी रुग्णालयांचे शुल्क खूप अधिक वाटत असल्याचे नमूद केले आहे.
सर्वेक्षणात कोणत्या वयोगटातील नागरिकांचा सहभाग?
-१८ ते ३५ वर्षे : २६.९ टक्के नागरिक
-३६ ते ५८ वर्षे : ६५.४ टक्के नागरिक
-५९ ते त्यापुढे : ७.७ टक्के नागरिक
१) उत्पन्नातील किती टक्के रक्कम तुमच्या आरोग्यावर खर्च होते?
- १० टक्के : ६५.४ टक्के नागरिक
- २५ टक्के : २३.१ टक्के नागरिक
- ५० टक्के : ११.५ टक्के नागरिक
- ७५ टक्के : ० टक्के नागरिक
२)उपचार घेण्यास कोणत्या रुग्णालयाला प्राधान्यक्रम देता?
- घाटी रुग्णालय : ११.५ टक्के नागरिक
- जिल्हा रुग्णालय : ८ टक्के नागरिक
- मनपा आरोग्य रुग्णालय : १०.५ टक्के नागरिक
- खासगी रुग्णालय : ७० टक्के नागरिक
३) तुम्ही आजारी पडल्यावरच रुग्णालयात जाता की, नियमित आरोग्य तपासणी करता?
- आजारी पडल्यावरच : ७३.१ टक्के नागरिक
नियमित आरोग्य तपासणी करतो :२६.९ टक्के नागरिक
४) खासगी रुग्णालयात आकारण्यात येणारे शुल्क कसे वाटते?
- अधिक : ३८.५ टक्के नागरिक
- खूप अधिक : ५३.८ टक्के नागरिक
- किफायतशीर : ७.७ टक्के नागरिक
५) तुम्ही आरोग्य विमा काढला आहे का?
- होय : ४६.२ टक्के नागरिक
- नाही : ५३.८ टक्के नागरिक
शहरातील आरोग्य सुविधा..
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
- जिल्हा सामान्य रुग्णालय
- शासकीय कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था)
- शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय
- राज्य कामगार विमा योजना रुग्णालये
- छावणी रुग्णालय
- महापालिकेची रुग्णालये-५
- मनपा आरोग्य केंद्र-३५
- शहरात खासगी रुग्णालये- ५५०
‘आयएमए’कडून फ्री ओपीडी सेवा
‘आयएमए’कडून ‘स्पेशालिस्ट फ्री ओपीडी’ सेवा दिली जाते. गेल्या २० वर्षात महागाई वाढली. कर वाढले. रुग्णालयांचे विविध खर्चही वाढले. त्यामुळे शुल्कही वाढले. सरकार, डाॅक्टर आणि संघटनेने एकत्र येऊन यावर विचार केला पाहिजे.
- डाॅ. विकास देशमुख, सचिव, आयएमए
नियमित व्यायाम महत्त्वाचा
जॉगिंग आणि धावणे हे व्यायाम सर्वांत सोपे आणि कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषांना उपयुक्त असतात. मधुमेह, निरोगी हृदय, वजन कमी करणे, हाडांची ताकद वाढविणे, श्वसन संस्था सुधारणे, मानसिक विश्रांती, चरबी कमी होणे आदींवर फायदा होतो.
- डॉ. प्रफुल्ल जटाळे, आयर्नमॅन
सर्वेक्षणात नागरिकांनी मांडलेली मते...
- केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार यांनी आरोग्य सेवा मोफत अथवा किफायतशीर दरात उपलब्ध करून द्यावी.
- शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांत सरकारी आरोग्य योजना लागू करण्यात करण्यात याव्या.
- खासगी रुग्णालयातील शुल्कांवर नियंत्रण आणावे.
- सरकारी रुग्णालयांत योग्य उपचार देऊन स्वच्छतेबाबत काळजी घेणे गरेजेचे.
- ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला आणखी बळकटी मिळावी.