आयकरची वेबसाइट हँग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:28 AM2017-11-01T00:28:19+5:302017-11-01T00:28:28+5:30

: आयकर आॅडिट रिपोर्ट दाखल करणे व रिटर्न भरण्यासाठी मंगळवारी अखेरचा दिवस होता; पण आयकर विभागाची वेबसाइट दुपारनंतर हँग झाली.

Income Tax website hang | आयकरची वेबसाइट हँग

आयकरची वेबसाइट हँग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आयकर आॅडिट रिपोर्ट दाखल करणे व रिटर्न भरण्यासाठी मंगळवारी अखेरचा दिवस होता; पण आयकर विभागाची वेबसाइट दुपारनंतर हँग झाली. यामुळे सीए, कर सल्लागारांचा ताण वाढला होता. रात्री उशिरापर्यंत कार्यालयात सीए व त्यांचे कर्मचारी बसून होते.
सोमवारी ३० आॅक्टोबर रोजी जुलै २०१७ ची जीएसटीआर-२ आणि जीएसटीआर-३ ही विवरणपत्रे भरण्यास अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. यामुळे व्यापारी, उद्योजक, सीए, करसल्लागारांना थोडासा दिलासा मिळाला होता; पण तो फार वेळ टिकू शकला नाही. कारण, आर्थिक वर्ष २०१६-२०१७ चे आयकर आॅडिट रिपोट दाखल करणे व रिटर्न भरण्याची ३१ आॅक्टोबर शेवटची तारीख होती. यामुळे सीए, करसल्लागारांमध्ये लगीनघाई सुरूहोती. एक आॅडिट रिपोर्ट दाखल करणे व रिटर्न ‘इन्कम ट्रॅक्स ई-फायलिंग डॉट जीओव्ही डॉट इन’ या वेबसाइटवर आॅनलाइन भरण्यास कमीत कमी अर्धातास लागत होता. एवढ्या धीम्यागतीने नेटवर्क सुरूहोते. दुपारी २ वाजेपासून वेबसाइटवर करदात्यांचा ‘आरएसए’ टोकन नंबर विचारला जाऊ लागला. यामुळे माहिती भरण्यास आणखी उशीर होऊ लागला. यात कहर म्हणजे ४.३० वाजेपासून तर वेबसाइट हँग झाली. यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. तासन्तास बसूनही एकही आॅडिट रिपोर्ट, रिटर्न दाखल होत नसल्याने सीए, करसल्लागार, अकाऊंटंट यांच्यावर मोठा ताण वाढला होता. सीए आॅफिसमध्ये करदात्यांचे सतत फोन खणखणत होते. यासंदर्भात सीए उमेश शर्मा यांनी सांगितले की, ज्यांची वार्षिक उलाढाल २ कोटींपेक्षा अधिक आहे. त्यांचा टॅक्स आॅडिट रिपोर्ट व रिटर्न दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. सोमवारी आम्ही दिवसभरात २६ फाइल अपलोड केल्या होत्या. मात्र, आज ६ फाइलच अपलोड करू शकलो. फाइल अपलोड करण्याचे बटण दाबले की, आपण ‘डिजिटल क्यू’ मध्ये आहात. असा संदेश मिळत होता. कारण, देशभरात एकाच वेळी लाखो फाइल अपलोड करण्यात येत असल्याने वेबसाइटवरील ताण प्रचंड वाढला व अखेर ती हँग झाली. जीएसटीप्रमाणे आयकर विभागही आॅडिट रिपोर्ट व रिटर्न भरण्याची तारीख वाढवून देते का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Web Title: Income Tax website hang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.