तपासात मनपाचे असहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:22 AM2017-10-25T00:22:06+5:302017-10-25T00:22:20+5:30

महानगरपालिकेच्या खात्यातून वीज बिलाचे ७१ लाख २९ हजार रुपये खाजगी व्यक्तींच्या नावे वीज बिल भरून अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते़ एक महिन्यानंतरही या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नसून तपास कामी महापालिकेतील अधिकारीच असहकार्य करीत असल्याची बाब समोर आली आहे़

The incompetence of the municipal investigation | तपासात मनपाचे असहकार्य

तपासात मनपाचे असहकार्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेच्या खात्यातून वीज बिलाचे ७१ लाख २९ हजार रुपये खाजगी व्यक्तींच्या नावे वीज बिल भरून अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते़ एक महिन्यानंतरही या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नसून तपास कामी महापालिकेतील अधिकारीच असहकार्य करीत असल्याची बाब समोर आली आहे़
परभणी महानगरपालिकेने वीज वितरण कंपनीकडून पथदिव्यांसाठी स्वतंत्र वीज जोडण्या घेतल्या आहेत़ पथदिव्यांच्या बिलाचा भरणा प्रत्येक महिन्याला महावितरणकडे आरटीजीएस पद्धतीने केला जातो़ मात्र या प्रकारात महापालिकेच्या पैशातून खाजगी व्यक्तींचे वीज बिल भरले जात असल्याची बाब उघड झाली़ २७ सप्टेंबर रोजी हा प्रकार निदर्शनास आला़ त्यानंतर महावितरण कंपनीने कोतवाली पोलीस ठाण्यात मनपाचे सहाय्यक अ़ जावेद अ़ शकूर आणि महावितरणमधील वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश सटवाजी घोरपडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला़ प्रारंभीच्या माहितीनुसार ७१ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक झाली असून, हे सर्व पैसे महापालिकेचे असल्याने मनपाने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेणे अपेक्षित असताना मनपाचेच तपासाला असहकार्य होत असल्याचे समोर येत आहे़
जून २०१५ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत महापालिकेने वीज बिलापोटी ८ कोटी ७२ लाख ३२ हजार ४०० रुपये महावितरणने दिले़ त्यापैकी ७१ लाख २९ हजार ६७ रुपयांच्या रकमेतून ७६४ ग्राहकांची वीज बिले भरण्यात आली होती़ याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय अधिकारी संभाजी मालकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़ गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस येवून जवळपास एक महिन्याचा कालवधी होत आहे़ या संपूर्ण काळात पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही़ तसेच या प्रकरणामध्ये संबंधितांची चौकशीही झाली नाही़ महानगरपालिका पोलिसांना सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़ मध्यंतरी दिवाळीचा कालावधी असल्याने प्रकरण थंड बस्त्स्यात पडले होते़ परंतु, त्यानंतरही तपासात प्रगती नसल्याचे दिसत आहे़ महापालिकेच्या मालकीच्या पैशांचा गैरव्यवहार झाला असल्याने मनपातील अधिकाºयांनी स्वत:हून पुढे येऊन तपासाला गती देणे आवश्यक आहे़ परंतु, मनपातील अधिकारी या प्रकरणाविषयी बोलायलाही तयार नाहीत़ त्यामुळे तपासाला गती मिळत नाही़
या प्रकरणात महानगरपालिकेने चौकशी समिती स्थापन केली़ परंतु, चौकशी समितीनेही अद्याप आपला स्पष्ट अहवाल दिलेला नाही़ त्यामुळे एक महिन्यापासून या गैरव्यवहार प्रकरणातील तपासाला गती मिळत नसल्याचेच दिसत आहे़

Web Title: The incompetence of the municipal investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.