कृषी सहायकांचे बेमुदत कामबंद

By Admin | Published: July 11, 2017 11:43 PM2017-07-11T23:43:20+5:302017-07-11T23:45:50+5:30

कुरूंदा : तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कृषी सहायक बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Incompetent Workshop of Agricultural Assistants | कृषी सहायकांचे बेमुदत कामबंद

कृषी सहायकांचे बेमुदत कामबंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कृषी सहायक बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. १० जुलैपासून तालुक्यातील सर्वच कृषी सहायक बेमुदत काम बंद आंदोलनात उतरले असल्याचे तालुका कृषी सहायक संघटनेचे सचिव पुंडगे यांनी सांगितले.
कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंध तत्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी सहाय्यकांनी जून महिन्यापासून आंदोलन पुकारले असून, यात काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर धरणे व त्यानंतर पुणे येथील आयुक्त (कृषी) कार्यालयावर भव्य मोर्चा असे आंदोलनाचे टप्पे पार पडले. त्यानंतरही शासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर बेमुदत काम बंदचे हत्यार संघटनेला उचलावे लागले.
या आंदोलनात संघटनेच्या तालुकाध्यक्षा अंबोरे, सचिव पुंडगे, कोषाध्यक्ष तिवारी यांच्यासह लोखंडे, देशमुख, माने, कांबळे, चव्हाण, कादर, कुंडलवाड, जाधव, मेटकर, तसेच महिलांमधून खंदारे, खाडे, जाधव, पडकंठवार व सर्व कृषी सहायक सहभागी झाले आहेत. यामुळे सध्या कृषी विभागाची अहवालासह विविध कामे ठप्प झाली आहेत.

Web Title: Incompetent Workshop of Agricultural Assistants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.