जिल्ह्यात १,४२९ कोरोना रुग्णांची वाढ, २७ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:04 AM2021-04-19T04:04:56+5:302021-04-19T04:04:56+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १,४२९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६५६, तर ग्रामीण भागातील ७७३ रुग्णांचा ...
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १,४२९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६५६, तर ग्रामीण भागातील ७७३ रुग्णांचा समावेश आहे, तर गेल्या २४ तासांत २७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २२ आणि अन्य जिल्ह्यांतील ५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,७३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९ हजार झाली आहे, तर आतापर्यंत ९१ हजार १०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,१५६ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८२५ आणि ग्रामीण भागातील ५४९ अशा १,३७४ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली.
उपचार सुरू असताना गंगापूर येथील ६० वर्षीय महिला, सावरकनगर येथील ६० वर्षीय पुरुष, रोहिला, कन्नड येथील ३५ वर्षीय महिला, वैजापूर येथील ७० वर्षीय महिला, गंगापूर, लहूपूर येथील ७९ वर्षीय पुरुष, सारखेडा, वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, मारुतीनगर, हर्सूल येथील ५८ वर्षीय पुरुष, गोधेगाव येथील ५० वर्षीय पुरुष, लिहाखेडी, सिल्लोड येथील ३५ वर्षीय पुरुष, माळी घोगरगाव, वैजापूर येथील ५७ वर्षीय महिला, पेठेनगर येथील ६१ वर्षीय महिला, स्नेहनगर, सिल्लोड ५६ वर्षीय महिला, आंबेडकरनगर येथील १३ वर्षीय मुलगी, जाधववाडी येथील ६० वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, बजाजनगरातील ३२ वर्षीय महिला, सेवापूर, कन्नड येथील ३१ वर्षीय पुरुष, टाकळी जिवरग, सिल्लोड येथील ५० वर्षीय पुरुष, आदगाव, कन्नड येथील ४६ वर्षीय पुरुष, व्यंकटेशनगर येथील ४८ वर्षीय महिला, कन्नड येथील ६० वर्षीय महिला, फुलंब्रीतील ४५ वर्षीय पुरुष आणि अंबड, जालना येथील ५५ वर्षीय महिला, इंद्रायनीनगर, जालना येथील ५० वर्षीय महिला, बोधडी, किनवट, नांदेड येथील ६५ वर्षीय पुरुष, अंबड, जालना येथील ७८ वर्षीय पुरुष, आरकेनगर, जळगाव येथील ४४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद ९, सातारा परिसर ३१, बीड बायपास १०, गारखेडा परिसर १९, शिवाजीनगर ८, एन-५ येथे १०, घाटी ४, एन-१२ येथे २, भडकलगेट १, चेतनानगर १, नंदनवन कॉलनी १२, एन-७ येथे १३, पडेगाव १०, ज्योतीनगर २, अजबनगर १, जवाहरनगर १, छावणी १, मिलिटरी हॉस्पिटल २, सेव्हन हिल १, राजीव गांधीनगर १, एमजीएम १, म्हाडा कॉलनी ७, आलमगीर कॉलनी १, प्रकाशनगर १, पुंडलिकनगर ४, उस्मानपुरा ४, पेठेनगर ३, एन-२ येथे ७, संजयनगर ३, देवळाई रोड ४, सूतगिरणी चौक २, पदमपुरा ६, भोईवाडा ३, बन्सीलालनगर ३, देवळाई ५, कोकणवाडी २, नागेश्वरवाडी ४, गादियाविहार १, वेदांतनगर १, नूतन कॉलनी १, उल्कानगरी ५, नक्षत्रवाडी ४, मिटमिटा १, शाहनूरवाडी ५, श्रीहरी पार्क १, कांचनवाडी १२, एन-६ येथे ३, मनीषा कॉलनी १, भाग्यनगर ४, जयभीमनगर १, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप १, व्यंकटेशनगर २, श्रेयनगर १, राजनगर २, हनुमाननगर १, पैठण रोड १, राधास्वामी कॉलनी २, मिलेनिअम पार्क ३, संघर्षनगर १, ठाकरेनगर १, जयभवानीनगर ६, चिकलठाणा ५, उत्तरानगरी ६, विमाननगर १, देवानगरी ३, स्वराजनगर १, नवजीवन कॉलनी ६, एन-४ येथे ८, ड्रीम कॉम्प्लेक्स केंब्रिज १, रामनगर ६, एन-३ येथे ३, विठ्ठलनगर २, १३ वी योजना सिडको १, तिरुपती कॉलनी १, न्यू एसटी कॉलनी १, सुराणानगर १, बाळापूर रोड १, बालाजीनगर २, मुकुंदनगर १, तिरुपती पार्क १, कामगार चौक १, परिजातनगर १, श्रद्धा कॉलनी, म्हाडा १, गजानन मंदिर ५, कासलीवाल मार्वल २, संग्रामनगर १, गणेशनगर १, द्वारकादासनगर १, अय्यप्पा मंदिर १, दिशानगरी १, हायकोर्ट कॉलनी १, सिंदवन भिंदवन १, गुरुशिष्य पारगाव १, तापडियानगर २, नाईकनगर १, एसआरपीएफ कॅम्प २, आयटीआय कॉलनी ३, ज्ञानेश्वरनगर १, बाळापूर फाटा १, विजयनगर १, विजयंतनगर १, गुरुप्रसादनगर ३, जवाहर कॉलनी २, सहकारनगर १, ज्योतीनगर १, ज्ञानेश्वरनगर १, वसंतविहार २, गजानननगर २, गजानन कॉलनी ४, बाळकृष्णनगर १, शिवशंकर कॉलनी ३, रेणुकापुरम २, दीपनगर २, अरुणोदय कॉलनी १, आदित्यनगर १, भगवती कॉलनी १, रेणुकानगर १, आभूषण पार्क १, नंदिग्राम कॉलनी १, विष्णूनगर १, समतानगर २, एन-९ येथे ७, आदर्शनगर १, सिंधी कॉलनी १, नाथनगर १, विशालनगर १, ईएसआयसी हॉस्पिटल १, एन-११ येथे ३, नारेगाव १, टी.व्ही. सेंटर २, बेगमपुरा १, महाराणा प्रताप चौक २, जाधववाडी ५, हर्सूल ५, प्रतापगडनगर १, घृष्णेश्वर कॉलनी १, मयूर पार्क ६, होनाजीनगर ३, चेतनानगर १, संत ज्ञानेश्वरनगर १, छत्रपतीनगर हर्सूल १, जटवाडा रोड १, दिशा सिल्व्हर टी-पाॅइंट १, सारा वैभव १, पवननगर १, राहत कॉलनी १, एन-१३ येथे १, हमालवाडा २, एम्स हॉस्पिटल १, कुंभारवाडा १, रुधावा कॉलनी १, पेशवेनगर २, हामेदिया कॉलनी २, खोकडपुरा २, शंकरनगर १, गोकुळनगर १, बंजारा कॉलनी १, रेल्वे स्टाफ २, धूत कंपनी १, एन-१ येथे २, शास्त्रीनगर १, जालाननगर २, संदेशनगर ३, हर्सूल टी-पॉइंट २, आलोकनगर १, विकासनगर, न्यू उस्मानपुरा १, स्वामी विवेकानंदनगर १, कोहिनूर कॉलनी १, मुकुंदवाडी ३, संजयनगर १, एन-८ येथे १, हडको १, बायजीपुरा १, इटखेडा १, दर्गा रोड १, गणेशनगर १, पीडब्ल्यूडी कॉलनी १, न्यू मोतीनगर १, श्रीकृष्णनगर ३, ऑरेंज सिटी १, छावणी २, समर्थनगर २, नवीन वस्ती १, मिलकॉर्नर १, शाहनूरमियाँँ दर्गा १, दिशा संस्कृती, पैठण रोड १, पैठण रोड १, खिंवसरा पार्क २, नागेश्वरवाडी २, स्टेशन रोड १, नारळी बाग १, अन्य १७०
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर ९, सिडको वाळूज महानगर ३, वडगाव १, सिल्लोड ४, पैठण १, तीसगाव १, आडूळ ता. पैठण १, वाळूज ३, पिसादेवी ५, गेवराई तांडा १, करोडी १, बोधेगाव ३, किणी, ता. सोयगाव १, घारेगाव २, पळशी २, गोंधेगाव १, हर्सूल गाव २, रांजणगाव १, वैजापूर १, वाहूळखेडा ता. सोयगाव १, करंजखेडा, ता. कन्नड १, लोणाडी, ता. सि ल्लोड १, ढोरकीण १, शेंद्रा १, आन्वी, ता. सिल्लोड १, सावंगी १, दातेगाव, ता. खुलताबाद १, पोखरी १, शिरेगाव, ता. गंगापूर १, शेवगाव १, फुलंब्री १, पिंपळगाव, ता. फुलंब्री १, नांदर, ता. पैठण १, अब्दी मंडी, दौलताबाद १, करमाड ३, खुलताबाद १, राऊलगडी, ता. कन्नड १, लोहार गल्ली, पैठण १, पटगाव १, खेडा १, कन्नड १, अन्य ७०६.