जिल्ह्यात १४३ कोरोना रुग्णांची वाढ, १९ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:02 AM2021-06-09T04:02:26+5:302021-06-09T04:02:26+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १४३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ३८, तर ग्रामीण भागातील १०५ रुग्णांचा ...
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १४३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ३८, तर ग्रामीण भागातील १०५ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील १४ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यांतील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या दोन हजार २४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ९४६ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३८ हजार ४१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ८५ आणि ग्रामीण भागातील १९८, अशा २८३ रुग्णांना सुटी देण्यात आली. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे. परंतु रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात सोमवारी कोरोना मृत्युदर ९.७९ टक्के राहिला.
उपचार सुरू असताना पाचोड, पैठण येथील ५९ वर्षीय पुरुष, हडको कॉर्नर येथील ७६ वर्षीय पुरुष, पैठण येथील ६२ वर्षीय महिला, कन्नड येथील ६० वर्षीय महिला, गंगापूर येथील ३० वर्षीय महिला, दौलताबाद येथील ४२ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ४५ वर्षीय पुरुष, शेवगाव, पैठण येथील ५५ वर्षीय पुरुष, बिडकीन, पैठण येथील ३५ वर्षीय पुरुष, वाळूज येथील ३५ वर्षीय पुरुष, लोहगाव, कन्नड येथील ४० वर्षीय महिला, आंबेडकरनगर येथील ६८ वर्षीय महिला, रशीदमामू कॉलनीतील ६५ वर्षीय महिला, स्टेशनरोड परिसरातील ६६ वर्षीय महिला आणि तळवाडा येथील ५६ वर्षीय पुरुष, बीड जिल्ह्यातील ६० वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ४२ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
जाधववाडी १, म्हाडा कॉलनी १, जालाननगर १, चिकलठाणा ३, अन्य ३२
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर ३, रांजणगाव २, हेरडपुरी, ता. पैठण २, सिडको वाळूज महानगर-१ येथे १, लोकमान्य चौक १, कासोदा, ता. गंगापूर १, अन्य ९५