जिल्ह्यात १४५८ कोरोना रुग्णांची वाढ; १४३३ जणांना सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:06 AM2021-04-23T04:06:11+5:302021-04-23T04:06:11+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १,४५८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,४३३ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. ...
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १,४५८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,४३३ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. शहरापेक्षा ग्रामीण भागांत अधिक रुग्ण आढळणे सुरूच आहे. गेल्या २४ तासांत २९ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २४ आणि अन्य जिल्ह्यांतील पाच रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या १५,०२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार ४९५ झाली आहे, तर आतापर्यंत ९७ हजार १९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,२७५ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील १,४५८ नव्या रुग्णांत शहरातील ६१२, तर ग्रामीण भागातील ८४६ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७४० आणि ग्रामीण भागातील ६९३ अशा १,४३३ रुग्णांना सुटी देण्यात आली.
उपचार सुरू असताना वैजापूर येतील ८० वर्षीय महिला, बीड बायपास परिसरातील ७३ वर्षीय महिला, इंदिरानगर येतील ३१ वर्षीय महिला, मिटमिटा येथील ९० वर्षीय पुरुष, एन-१२ येथील ५६ वर्षीय पुरुष, पहाडसिंगपुरा येथील ८१ वर्षीय पुरुष, एन-११ येथील ५१ वर्षीय महिला, शेकपूर, खुलताबाद येथील ३२ वर्षीय पुरुष, उल्कानगरी येथील ७९ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ६५ वर्षीय महिला, भीमनगर-भावसिंगपुरा येथील ३४ वर्षीय पुरुष, पिसादेवी रोड, हर्सूल येथील ६० वर्षीय पुरुष, बेळगाव,वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, मयूर पार्क, हर्सूल येथील ६९ वर्षीय पुरुष, कुंभेफळ, शेंद्रा येथील ६८ वर्षीय महिला, गारखेडा येथील ८५ वर्षीय महिला, मयूर पार्क, गंगापूर येथील ५८ वर्षीय पुरुष, कालीका माता मंदिर परिसरातील ६८ वर्षीय पुरुष, जरांडी, सोयगाव येथील ४३ वर्षीय पुरुष, पिंपरीराजा येथील ७१ वर्षीय महिला, गुरुदत्तनगर येथील ६७ वर्षीय पुरुष, बजाजनगरातील ६० वर्षीय महिला, गोळेगाव, सिल्लोड येथील ५० वर्षीय महिला, एन-७ येथील ६५ वर्षीय पुरुष आणि वसमत, हिंगोली येथील ६० वर्षीय महिला, माजलगाव, बीड येथील ५३ वर्षीय पुरुष, हसनाबाद, भोकरदन, जालना येथील ७० वर्षीय महिला, अहमदनगर येथील ५५ वर्षीय पुरुष, आणि उशेगाव, भोकरदन, जालना येथील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद ४, घाटी ४, सातारा परिसर २४, गारखेडा परिसर १०, शिवाजी नगर ८, बीड बायपास ९, हर्सूल १०, म्हाडा बाबा पेट्रोल पंप १, बन्सीलाल नगर १, नारळीबाग १, न्यू विशाल नगर १, पडेगाव २, भाग्य नगर २, नंदनवन कॉलनी २, चिकलठाणा ९, मयूर पार्क ७, एन-११ येथे १, जय भवानी नगर ८, म्हाडा कॉलनी १, पुंडलिक नगर २, विजयंत नगर २, जवाहर कॉलनी २, विश्रांती नगर ३, रामनगर ४, एन-६ येथे ७, एन-१ येथे ६, मोती नगर २, एकविरा हॉस्पिटल १, गजानन कॉलनी ४, हनुमान नगर २, मुकुंदवाडी ४, ठाकरे नगर ४, विठ्ठल नगर १, एन-३ येथे ४, गणेश नगर २, एन-४ येथे ७, महाजन कॉलनी १, बालजी नगर २, गजानन नगर १०, विवेकानंद नगर १, चौरंगी हॉटेल १, विशाल नगर २, नाईक नगर ३, आदर्श कॉलनी २, अरिहंत नगर १, शिवशंकर कॉलनी ८, अलंकार सोसायटी १, विजय नगर २, राज नगर २, नाथ नगर ३, शहानूरवाडी २, बालाजी नगर १, मेहेर नगर १, गादिया विहार ३, जवाहर कॉलनी १, मल्हार चौक १, सूतगिरणी चौक २, भारत नगर १, एन-७ येथे ८, छावणी २, उल्का नगरी ४, बाळकृष्ण नगर १, चाणक्य पुरी १, शहानूरमियॉ दर्गा १, उस्मानपुरा २, आलोक नगर २, कासलीवाल तारांगण २, कासलीवाल रेसिडेंन्सी १, मित्र नगर १, नवजीवलन कॉलनी १, भोईवाडा १, उत्तरा नगरी ३, म्हाडा कॉलनी २, एन-२ येथे ४, नारेगाव ८, एन-१२ येथे ४, द्वारकादास नगर १, गुरुसाक्षी हाऊसिंग सोसायटी १, कासलीवाल मार्वल १, अयप्पा मंदिराजवळ १, जालान नगर २, महेश नगर १, सिडको २, हायकोर्ट कॉलनी १, माऊली नगर १, ऑरेंज सिटी १, ईटखेडा ३, नक्षत्रवाडी १, कांचनवाडी ४, सिल्कमिल कॉलनी १, तापडिया नगर १, नवजीवन कॉलनी २, ब्रिजवाडी १, एन-५ येथे १, अशोक नगर १, पिसादेवी रोड २, ऑडिटर सोसायटी १, देवळाई चौक १, जाधववाडी ३, राधाकृष्ण कॉलनी १, सारा परिवर्तन १, प्रतापगड नगर १, जटवाडा रोड २, सुभाष नगर २, भगतसिंग नगर १, गोकुळ नगर १, भारतमाता नगर १, एन-९ येथे १, नवनाथ नगर १, रोझा बाग १, जाधवमंडी १, एमआयडीसी कॉलनी १, एमआयडीसी चिकलठाणा १, समर्थ नगर ५, बसैये नगर १, न्यू हनुमान नगर १, आकाशवाणी १, होनाजी नगर १, मिलेनिअम पार्क चिकलठाणा १, इंदिरानगर १, शिवशक्ती कॉलनी १, एमजीएम हॉस्पिटल १, प्रगती कॉलनी १, देशमुख नगर उस्मानपुरा १, प्रभाश्री घरवाल रेसिडेंन्सी १, कोकणवाडी १, विकास नगर १, काल्डा कॉर्नर न्यू श्रेय नगर १, मिटमिटा ४, पहाडसिंगपुरा १, भारती कॉलनी १, ज्योती नगर १, प्रकाश नगर २, हरिश्चंद्र नगर २, पद्मपुरा १, मेल्ट्रॉन हॉस्पिटल १, सुंदरवाडी १, प्रतापनगर १, देव्हाडा नगर १, भवानी नगर सिडको १, अन्य २६८
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाज नगर १, वाळूज ४, सिडको वाळूज महानगर २, तिसगाव १, पुरी (ता. गंगापूर) १, रांजणगाव ४, चिते पिंपळगाव २, जटवाडा १, मेघा इंजिनिअरिंग पळशी २, आडगाव विखे १, मांडना (ता. सिल्लोड )१, बाभूळगाव १, वरझडी (ता. गंगापूर) १, लोणवाडी (ता. सिल्लोड) १, सिल्लोड २, नायगाव खांडेवाडी १, पिसादेवी १, सावंगी ४, म्हसला (ता. सिल्लोड) १, बोधेगाव (ता. फुलंब्री) १, लायेगाव १, यशवंत नगर पैठण १, प्रवरा संगम १, वरुड काझी १, वाहेगाव १, फुलंब्री १, बीडगाव (ता. सिल्लोड) १, अन्य ८०६