शहरात १७, ‘ग्रामीण’मध्ये ७६ कोरोना रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:04 AM2021-07-02T04:04:36+5:302021-07-02T04:04:36+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात कोरोनाच्या ९३ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील १७, तर ग्रामीण भागातील ७६ ...
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात कोरोनाच्या ९३ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील १७, तर ग्रामीण भागातील ७६ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना तीन महिला रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ६७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात कोरोना रुग्णांचा आलेख घसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या वीसपेक्षा कमी राहात आहे. काही दिवस रुग्णसंख्या एकेरी संख्येतही आली. त्या उलट ग्रामीण भागांत दररोज ५० पेक्षा अधिक रुग्णांचे निदान होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४६ हजार ३०१ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४२ हजार २०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील २० आणि ग्रामीण भागातील ४९ अशा ६९ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना येसगाव, खुलताबाद येथील ७० वर्षीय महिला, नारेगाव येथील ७१ वर्षीय महिला, वेरुळ, खुलताबाद येतील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
आझाद चौक १, टाऊन सेंटर १, देवळाई चौक १, एन-८, सिडको १, टी.व्ही.सेंटर १, नक्षत्रवाडी १, अन्य ११.
ग्रामीण भागातील रुग्ण
फुलंब्री ४, गंगापूर १२, कन्नड ३०, खुलताबाद १, वैजापूर १६, पैठण १३.