जिल्ह्यात १९ कोरोना रुग्णांची वाढ, दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:04 AM2021-09-22T04:04:42+5:302021-09-22T04:04:42+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात मनपा हद्दीत ८ आणि ग्रामीण भागात ११ अशा १९ कोरोना रुग्णांची वाढ झाली. उपचार ...
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात मनपा हद्दीत ८ आणि ग्रामीण भागात ११ अशा १९ कोरोना रुग्णांची वाढ झाली. उपचार घेऊन २० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, गेल्या २४ तासांत २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा एकदा घसरत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात सध्या १९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ५३९ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ७७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३ हजार ५६४ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८ आणि ग्रामीण भागातील १२ अशा २० रुग्णांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली. उपचार सुरु असताना लाेहगाव, पैठण येथील ४३ वर्षीय पुरुष आणि शिंदेवाडी, गंगापूर येथील ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
प्रतापनगर १, आलोकनगर १, विमानतळ परिसर १, घाटी परिसर १, काली मस्जिद १, अन्य ३
ग्रामीण भागातील रुग्ण
गंगापूर ६, वैजापूर ४, पैठण १