जिल्ह्यात २५ कोरोना रुग्णांची वाढ, २ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:02 AM2021-08-12T04:02:17+5:302021-08-12T04:02:17+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ८, तर ग्रामीण भागातील १७ ...
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ८, तर ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या २३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील ३ दिवस रोज निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ही १८ च्या खाली होती. मात्र, तीन दिवसांनंतर मंगळवारी ही संख्या २५ झाली. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कमी प्रमाणात रुग्ण आढळणे अजूनही कायम आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४७ हजार ६४८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ८९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत तीन हजार ५१५ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ५ आणि ग्रामीण भागातील २४, अशा २९ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना चांगतपुरी, पैठण येथील ६५ वर्षीय पुरुष, पिंपळगाव, वैजापूर येथील ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
ब्रिजवाडी १, पडेगाव १, मुकुंदवाडी २, कांचनवाडी १, हर्सूल १, गुलमोहर कॉलनी १, देवळाई परिसर १.
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद ३, फुलंब्री २, गंगापूर ४, कन्नड १, वैजापूर ४, पैठण ३.