जिल्ह्यात २८१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:05 AM2021-02-25T04:05:01+5:302021-02-25T04:05:01+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, बुधवारी दिवसभरात तब्बल २८१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर ...

An increase of 281 new corona patients in the district | जिल्ह्यात २८१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ

जिल्ह्यात २८१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, बुधवारी दिवसभरात तब्बल २८१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७१ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना तीन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १३१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ४९ हजार २९१ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ७२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. १,२५८ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या २८१ रुग्णांत एकट्या मनपा हद्दीतील सर्वाधिक २६२, तर ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५० आणि ग्रामीण भागातील २१, अशा एकूण ७१ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील ४७ वर्षीय पुरुष, शहरातील कलेक्टर ऑफिस कंपाऊंड परिसरातील ७४ वर्षीय पुरुष आणि देवगाव रंगारी, कन्नड येथील ८० वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

एन-३ सिडको ६, बीड बायपास ५, गुलमंडी १, एन-९ येथील १, एन-५ येथील १, एन-७ येथे ३, चंद्रनगर सिडको १, श्रीकृष्णनगर १, हर्सूल ३, रामनगर २, नारेगाव १, नारळीबाग २, सावरकर चौक १, गारखेडा ३, हनुमाननगर १, लक्ष्मीनगर १, रामायणा कल्चरल हॉल १, नंदनवन कॉलनी ५, एन-सहा १, हडको ३, कासलीवाल विश्व १, कैलासनगर १, पुंडलिकनगर २, ज्योतीनगर ५, श्रेयनगर १, शिवाजीनगर २, जयभवानीनगर १, एन-दोन ३, वेदांतनगर १, एन-एक सिडको २, दशमेशनगर १, देवळाई रोड परिसर ३, मुकुंदवाडी १, एन चार-२, गादिया विहार २, पडेगाव ३, चिकलठाणा १, एन आठ १, शिवशंकर कॉलनी ३, चेतक घोडा परिसर १, राधास्वामी कॉलनी १, घाटी परिसर २, जाधववाडी २, सुराणानगर १, प्रतापनगर २, संजयनगर १, वसुंधरा कॉलनी १, पदमपुरा २, वेदांतनगर २, सातारा परिसर १, पिसादेवी १, एसबी कॉलनी १, निराला बाजार ३, खिंवसरा पार्क १, समर्थनगर राजतारा हौ. सो. २, सिंधी कॉलनी २, सुयोग हौ. सो. १, शक्तीनगर, सीबीएस रोड ३, इसीआय मोबिलिटी प्रा. लि. २, अन्य १५१.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर ५, राजतारा हौ. सो. २, अन्य १२.

Web Title: An increase of 281 new corona patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.