जिल्ह्यात ३९ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:06 AM2021-01-20T04:06:02+5:302021-01-20T04:06:02+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३९ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ५२ जण कोरोनामुक्त झाले, तसेच उपचार सुरू असताना ...
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३९ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ५२ जण कोरोनामुक्त झाले, तसेच उपचार सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील एक आणि अन्य जिल्ह्यांतील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात एकूण ४६ हजार ५६७ रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंत ४५ हजार ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत १ हजार २२८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या २४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ३९ रुग्णांत मनपा हद्दीतील ३६, ग्रामीण भागातील ३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४६ आणि ग्रामीण भागातील ६, अशा एकूण ५२ रुग्णांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली. फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी येथील ७० वर्षीय स्त्री आणि अहमदनगर जिल्ह्यातील ६९ वर्षीय पुरुष कोरोनाबधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण गारखेडा परिसर ३, अनुपमा हौसिंग सोसायटी, उस्मानपुरा ३, हर्सुल १, साईनाथनगर १, खाराकुआँ १, देवानगरी ३, दिशानगरी २, गादिया विहार १, रेणुका माता मंदिर १, रामगोपालनगर १, सम्राटनगर १, दशमेशनगर २, एमजीएम परिसर १, बीड बायपास ३, अन्य १२
ग्रामीण भागातील रुग्ण
फुलंब्री १, अन्य २