४० कोरोना रुग्णांची वाढ, दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:02 AM2021-01-13T04:02:01+5:302021-01-13T04:02:01+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ४० कोरोना रुग्णांची भर पडली, तर ८६ जण कोरोनामुक्त झाले. तसेच उपचार सुरू असताना ...
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ४० कोरोना रुग्णांची भर पडली, तर ८६ जण कोरोनामुक्त झाले. तसेच उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार १९९ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत ४४ हजार ५७० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार २१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ४० रुग्णांत मनपा हद्दीतील ३६, ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७७ आणि ग्रामीण भागातील ९, अशा एकूण ८६ रुग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली. खुलताबाद तालुक्यातील ६७ वर्षीय स्त्री आणि जवाहर कॉलनीतील ६३ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
कौशलनगर १, एन सहा, शिवज्योती कॉलनी १, मयूरबन कॉलनी १, बजरंगनगर , चिकलठाणा १, एन दोन, सिडको १, जयभवानीनगर १, एन सहा, अविष्कार कॉलनी १, किराडपुरा १, एन पाच, पारिजातनगर १, मयूर पार्क १, कांचनवाडी १, समर्थनगर ४, आदर्श कॉलनी १, एमजीएम परिसर १, मंगल मेडिसेंटरजवळ, श्रेयनगर ३, राधाकृष्ण रेसिडन्सी, मिटमिटा १, दिल्ली गेट १, बन्सीलालनगर १, जयनगर, उस्मानपुरा १, एन नऊ, शिवाजीनगर २, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी २, ज्योतीनगर २, साकेतनगर १, बेगमपुरा १, गजानन चौक, एन सहा येथे १, पीएसबीए इंग्लिश स्कूल १, अन्य २
ग्रामीण भागातील रुग्ण
पैठण १, सिल्लोड १, अन्य २