जिल्ह्यात ४८ कोरोना रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:04 AM2021-07-08T04:04:07+5:302021-07-08T04:04:07+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात नव्याने निदान होणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या ५० खाली कायम असून, बुधवारी दिवसभरात ४८ रुग्णांची वाढ ...
औरंगाबाद : जिल्ह्यात नव्याने निदान होणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या ५० खाली कायम असून, बुधवारी दिवसभरात ४८ रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील १९, ग्रामीण भागातील २९ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. शहरातील नव्या रुग्णांची संख्या सलग १३व्या दिवशी २० खाली राहिली. त्यातही सक्रिय म्हणजे उपचार सुरू असलेल्या शहरातील एकूण रुग्णांची संख्याही ५० खाली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागांतील ४१४ रुग्णांवर तर शहरात अवघ्या ४९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ५२८ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ६२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १२ आणि ग्रामीण भागातील ३७ अशा ४९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना, पैठण येथील २८ वर्षीय महिला, शहरातील शंभूनगर, गादिया विहार येथील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी १, ईटखेडा पैठण रोड १, संदेशनगर २, धूत हॉस्पिटलजवळ १, एन-७ येथे १, सातारा परिसर २, एसआरपीएफ कॅम्प १, चिकलठाणा १, जयभवानीनगर १, अन्य ८.
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद २, गंगापूर ८, खुलताबाद १, वैजापूर १५, पैठण ३.