औरंगाबादेत ६३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, एक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 09:51 AM2020-06-04T09:51:15+5:302020-06-04T09:51:53+5:30
एकुण रुग्णसंख्या १७६७,१११३ घरी परतले,
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ४) सकाळी ६३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर बुधवारी सायंकाळी समता नगर येथील एका कोरोनाबधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची एकुण संख्या १७६७ झाली आहे. यापैकी १११३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले तर असून ८९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना बाधित रुग्णांत बेगमपुरा २, लेबर कॉलनी १, पडेगाव १, बायजीपुरा १, हर्सुल परिसर १, भारतमाता नगर १, संजय नगर, मुकुंदवाडी १, रोशन गेट २, देवळाई चौक परिसर १, समर्थ नगर १, शिवशंकर कॉलनी ५, शिवाजी कॉलनी १, सईदा कॉलनी १, चेतना नगर २, एन-सात सिडको १, एन-२ विठ्ठल नगर १, विनायक नगर, जवाहर कॉलनी १, बारी कॉलनी १, हनुमान नगर, गारखेडा १, मिल कॉर्नर १, एन चार १, क्रांती नगर १, विजय नगर, गारखेडा १, एन सहा संभाजी कॉलनी ६, अयोध्या नगर १, न्यू हनुमान नगर १, कैलास नगर १, अजिंक्य नगर, गारखेडा १, एन १ सिडको १, सुंदर नगर, पडेगाव १, गणेश कॉलनी २, एन ४ समृद्धी नगर सिडको २, कटकट गेट, नेहरू नगर १, आंबेडकर नगर, एन -७ येथील ३, जय भवानी नगर १, राजा बाजार ४, अन्य ६ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २६ महिला आणि ३७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
एक मृत्यू, आकडा ८९
एका खासगी रुग्णालयामध्ये समता नगरातील कोरोनाबाधित असलेल्या ४३ वर्षीय पुरूष रुग्णाचा बुधवारी (दि ३) सायंकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ८९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.