जिल्ह्यात ६५५ कोरोना रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:03 AM2021-05-11T04:03:27+5:302021-05-11T04:03:27+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ६५५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,२४७ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या ...
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ६५५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,२४७ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २४ आणि अन्य जिल्ह्यांतील ८ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ७,४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजार २४ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,७७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांत शहरातील २१४, तर ग्रामीण भागातील ४४१ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६०७ आणि ग्रामीण भागातील ६४० अशा १,२४७ रुग्णांना सुटी देण्यात आली.
उपचार सुरू असताना वाळूज येथील ३६ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ३५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६१ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ५५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ९० वर्षीय महिला, कन्नड येथील ५५ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ४६ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६४ वर्षीय पुरुष, पैठण येथील ७० वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ४३ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६५ वर्षीय महिला, शंकरपूर, गंगापूर येथील ६५ वर्षीय महिला, पळशीतील ६१ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ३७ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ५३ वर्षीय पुरुष, रांजणगाव, पैठण येथील ४५ वर्षीय महिला, कन्नड येथील ३६ वर्षीय पुरुष, एन-४ येथील ९० वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ३९ वर्षीय पुरुष, मयूरपार्क येथील ८५ वर्षीय पुरुष, उल्कानगरीतील ६० वर्षीय पुरुष, सातारा परिसरातील ६७ वर्षीय पुरुष, भीमनगर येथील ५२ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ५५ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, ७२ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, ८० वर्षीय महिला, ६६ वर्षीय महिला, नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद २, सातारा परिसर ८, बीड बायपास ७, गारखेडा ५, शिवाजीनगर ५, घाटी ५, पीर बाजार १, पडेगाव ३, नारेगाव २, बालेवाडी १, खाराकुंआ १, पैठण गेट १, पुंडलिकनगर ५, हनुमाननगर १, गजानननगर १, जवाहर कॉलनी २, न्यायनगर २, राजनगर १, गुरुदत्तनगर १, कॅनॉट २, एन-४ येथे ४, लक्ष्मीनगर, जटवाडा रोड १, एन-२ येथे १, मुकुंदवाडी ६, रामनगर १, स्वराजनगर १, जयभवानीनगर २, एन-१ येथे १, एन-८ येथे २, राधास्वामी कॉलनी २, चेतनानगर, हर्सूल १, गुरुचरण रेसिडेन्सी १, जाधववाडी १, राजे संभाजीनगर १, एकतानगर १, मयूर पार्क ३, एन-६ येथे १, चाटे स्कूल १, लक्ष्मी कॉलनी २, पेशवेनगर ३, देवळाई परिसर ४, श्रेयनगर २, दिशानगरी १, कांचनवाडी २, नक्षत्रपार्क १, आंबेडकरनगर १, काला दरवाजा १, एन-१२ येथे १, शिवशंकर कॉलनी १, श्रेयनगर २, देवानगरी १, चिकलठाणा १, छावणी ३, एन-७ येथे १, कार्तिकनगर १, नंदनवन कॉलनी २, मामा चौक पद्मपुरा १, चाणक्यपुरी १, गौतमनगर १, भावसिंगपुरा १, उस्मानपुरा १, हनुमाननगर १, छत्रपतीनगर १, बनेवाडी १, शहानूरवाडी १, अबरार कॉलनी १, विमानतळ १, अरिहंतनगर २, जालाननगर १, सिडको गार्डन १, अन्य ८२.
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर ८, वडगाव १, पंढरपूर १, पाटोदा १, रांजणगाव १, गुरुसाक्षी फत्तेपूर २, वडगाव १, सिडको वाळूज महानगर २, वैजापूर १, कृष्णपूरवाडी २, मांडकी २, करोडी १, तीसगाव १, गंगापूर १, गारेगाव, पिंप्रीराजा १, कन्नड १, भराडी (ता. सिल्लोड) २, वसई (ता. सिल्लोड) १, कन्नड १, सावखेडा खंडाळा १, पळशी १, चितेगाव १, पानवी (बु) (ता. वैजापूर) १, लासूर नाका, (ता. गंगापूर) १, अन्य ४०५.