शहरात ७, ‘ग्रामीण’मध्ये ३० कोरोना रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:04 AM2021-07-21T04:04:02+5:302021-07-21T04:04:02+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ७, ग्रामीण भागातील ३० रुग्णांचा ...
औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ७, ग्रामीण भागातील ३० रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ३६ जणांना सुटी देण्यात आली, तर उपचार सुरू असताना जिल्ह्यातील दोन आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी दहाखाली आली. ग्रामीण भागांत शहरापेक्षा अधिक रुग्ण आढळणे सुरुच आहे.
जिल्ह्यात सध्या २८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २६६ आणि शहरातील २२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १ लाख ४७ लाख ५६ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार २९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४७७ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ११ आणि ग्रामीण भागातील २५ अशा ३६ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना पडेगाव येथील ३५ वर्षीय महिला, गारखेडा परिसरातील ८० वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
गारखेडा परिसर १, मयूर पार्क १, जवाहरनगर २, हरसिद्धी लॉन्स, जटवाडा रोड १, अन्य २
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद ४, फुलंब्री १, गंगापूर ४, खुलताबाद ४, वैजापूर १२, पैठण ५