कोरोनाच्या ७६ रुग्णांची वाढ, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:06 AM2021-01-03T04:06:21+5:302021-01-03T04:06:21+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ७६ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ५७ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना ...
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ७६ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ५७ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ७६२ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४४ हजार ७० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ७६ रुग्णांत मनपा हद्दीतील ६९, ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४२ आणि ग्रामीण भागातील १५ अशा एकूण ५७ रुग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली. पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगरातील ७५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
मनपा हद्दीतील रुग्ण
धूत हॉस्पिटल परिसर २, जटवाडा रोड २, एन सात १, अरिहंतनगर १, एन चार १, आविष्कार कॉलनी १, सावंगीकर हॉस्पिटलजवळ १, एन नऊ १, स्नेहनगर २, मुकुंदवाडी १, उत्तरानगरी १, एसबीआय मुख्यालय परिसर २, शाहूनगर १, भावसिंगपुरा १, बीड बायपास २, समर्थनगर २, इटखेडा १, केंद्रीय विद्यालय, नगरनाका परिसर १, कांचनवाडी १, एन अकरा, गजानननगर १, पडेगाव १, सेंट्रल नाका १, अन्य ४१.
ग्रामीण भागातील रुग्ण
लासूर सावंगी १, पैठण १, कन्नड १, अन्य ४.