जिल्ह्यात ९९ रुग्णांची वाढ, ८२ रुग्णांना सुटी
By | Published: December 4, 2020 04:05 AM2020-12-04T04:05:03+5:302020-12-04T04:05:03+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (दि. २) दिवसभरात कोरोनाच्या ९९ नव्या रुग्णांची वाढ झाली. उपचार पूर्ण झालेल्या ८२ रुग्णांना सुटी ...
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (दि. २) दिवसभरात कोरोनाच्या ९९ नव्या रुग्णांची वाढ झाली. उपचार पूर्ण झालेल्या ८२ रुग्णांना सुटी देण्यात आली. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील एक आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत रुग्णांची संख्या ४३,५७२ झाली आहे. यातील ४१,३८८ रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत. तर १,१५० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १,०३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ९९ रुग्णांत मनपा हद्दीतील ८३, ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७२ आणि ग्रामीण १० अशा ८२ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना नवजीवन कॉलनीतील ७९ वर्षीय पुरुष आणि जालना जिल्ह्यातील ४५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
रेल्वेस्टेशन परिसर २, रोशनगेट १, शिवशंकर कॉलनी १, ठाकरेनगर १, अविष्कार कॉलनी, सिडको १, दत्त नगर एन -४, सिडको १, पवन नगर सिडको १, एन -७, शास्त्रीनगर सिडको १, देवळाई रोड, बीड बायपास १, सूतगिरणी परिसर १, देवानगरी १, नारायणनगर, सातारा परिसर १, एसआरपीएफ कॅम्प १, मुकुंदवाडी १, पडेगाव २, एअरपोर्ट परिसर १, औरंगाबाद सिटी १, कामगार चौक सिडको १, जालाननगर १, जुना मोंढा १, संघर्ष नगर, एन-२ सिडको १, एन-८ सिडको १, कांचनवाडी १, एन सहा सिडको २, रामगोपाल नगर, पडेगाव १, उत्तरानगरी १, राजेसंभाजी कॉलनी १, एन चार सिडको १, अन्य ५२.
ग्रामीण भागातील रुग्ण
करमाड १, वाळूज १, फुलंब्री १, महालगाव, वैजापूर १, लासूर स्टेशन १ व अन्य ११.