सहा मतदारसंघात ३३ हजार नवीन मतदारांत वाढ

By Admin | Published: September 13, 2014 11:39 PM2014-09-13T23:39:55+5:302014-09-13T23:39:55+5:30

लातूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात जुलै अखेरपर्यंत १७ लाख १३ हजार ९२३ मतदारांची नोंदणी झाली असून,

An increase of about 33 thousand new voters in six constituencies | सहा मतदारसंघात ३३ हजार नवीन मतदारांत वाढ

सहा मतदारसंघात ३३ हजार नवीन मतदारांत वाढ

googlenewsNext


लातूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात जुलै अखेरपर्यंत १७ लाख १३ हजार ९२३ मतदारांची नोंदणी झाली असून, गत लोकसभा निवडणुकीतील मतदारांच्या तुलनेत आता ३२ हजार ८२८ मतदारांची संख्या वाढल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग पोले यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली़ मतदान यादीत नाव नसलेल्यांना रविवारीही आपली नावे नोंदविता येतील, असेही सांगितले़
आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करून जिल्हाधिकारी पांडुरंग पोले म्हणाले, जिल्ह्यातील मतदारसंघात एकूण १९१८ बूथ आहेत़ यात लातूर शहर मतदारसंघात ३०८, लातूर ग्रामीणमध्ये ३३७, अहमदपूर ३४१, उदगीर २९७, निलंगा ३३२, औसा ३०३ अशी बूथ संख्या आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक मतदार लातूर शहर मतदारसंघात असून, ३ लाख २६ हजार ७१० अशी संख्या आहे़ त्यापाठोपाठ लातूर ग्रामीण मतदारसंघात २ लाख ९२ हजार ५२४ मतदार आहेत़ अहमदपुरात २ लाख ८६ हजार ८२, उदगीर २ लाख ६९ हजार ६२८, निलंगा २ लाख ८२ हजार ७८०, औसा २ लाख ५६ हजार १९७ मतदार आहेत़ लातूर ग्रामीण मतदारसंघाचे निवडणूकनिर्णय अधिकारी हे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील यादव असून, उर्वरित मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी उपविभागीय अधिकारी आहेत़ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार काम पाहणार आहेत़ लातूर ग्रामीण मतदारसंघात लातूर तहसीलमधील गातेगाव, मुरुड, कासारखेडा, तांदूळजा या मंडळांचा तसेच रेणापूर तालुका आणि औसा तालुक्यातील भादा मंडळाचा समावेश आहे़ लातूर शहर मतदारसंघात शहर व लातूर महसूल मंडळातील गावे आहेत़ अहमदपूर मतदारसंघात अहमदपूर व चाकूर तालुका त्याचबरोबर उदगीर मतदारसंघात उदगीर व जळकोट तालुका आहे़ निलंगा मतदारसंघात निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी तालुक्याचा समावेश आहे़ तसेच औसा मतदारसंघात निलंगा तालुक्यातील कासारशिरसी, कासारबालकुंदा व मदनसुरी मंडळ आणि औसा तालुक्यातील भादा मंडळ वगळून संपूर्ण औसा तालुक्याचा समावेश आहे़ यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी पी़बीख़पले, अपर जिल्हाधिकारी पाटोदकर यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यावी़ आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भात मतदारांना आता दूरध्वनीवरही तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ तक्रारीनंतर पथकामार्फत योग्य ती दखल घेतली जाईल़ तसेच जिल्हास्तरावरही यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे़ मतदानासाठी छायाचित्र असलेला पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे़ त्यामुळे मतदारांजवळ आवश्यक तो पुरावा असणे गरजेचे आहे़
खर्चाची २० पासून नोंद़़़
४विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची खर्चाची नोंद निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याच्या दिवसीपासून घेतली जाईल़ मतदारसंघाव्यतिरिक्त अन्य मतदारसंघात एखाद्या उमेदवाराने खर्च केल्यास त्याची माहिती निवडणूक विभागास सादर करणे आवश्यक राहणार नाही़ तसेच चार-पाच सोशल नेटवर्किंग साईटवर जाहिरात केल्यास उमेदवाराला त्यासंदर्भातील खर्च सादर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले़
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जनजागृतीपर रॅली, महाविद्यालयीन युवकांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत़ गत लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघाची मतदानाची टक्केवारीही ७़५ टक्क्यांनी वाढली आहे़ यात आणखीन १० ते १५ टक्के वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत़

Web Title: An increase of about 33 thousand new voters in six constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.